छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका सुरू झाल्या. काही मालिका हिट ठरल्या तर काही मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र गेले काही वर्ष टीआरपी यादीवर स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व दिसून आलं. आता अखेर दोन वर्षांनी स्टार प्रवाहच्या वर्चस्वाला धक्का देत झी मराठीच्या मालिकांनी टीआरपी यादीत टॉप १० मध्ये एंट्री घेतलीये. त्यातच आता झी मराठीने प्रेक्षकांना आणखी एक गुडन्यूज दिलीये. लवकरच झी मराठीवर एक नाही दोन नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. नुकतेच झी मराठीने या मालिकांचे प्रोमो शेअर केलेत. जे पाहून प्रेक्षक खुश झालेत.
काही दिवसांपूर्वी झी मराठीने वल्लरी विराजच्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेची घोषणा केली. मात्र या मालिकेची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्याआधीच वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केलीये. ‘झी मराठी’वर नव्याने सुरू होणाऱ्या दोन मालिकांपैकी पहिल्या मालिकेचं नाव आहे ‘सनई चौघडे’. या प्रोमोमध्ये मुख्य नायिका म्हणते, 'तुम्हाला सांगते, मुलं शोधणं इतकं कठीण झालंय…. हे सगळं करून जर मुलगा सापडला तर दोघांचे विचार जुळतील का? आणि जरी जुळवून घ्यायची तयारी दाखवली तरी नातं टिकेल का? याची खात्री नसते. अहो आम्हाला तर चार मुली आहेत पण, त्या आम्हाला जड नाहीत बरं का…पण आई म्हणून काळजी असतेच ना! प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. वाजंत्री मुहूर्तावरच वाजणार!”
View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
तर दुसऱ्या प्रोमोमध्ये म्हटलंय, 'एक सून सुडाच्या भावनेने घर अंधारात ढकलणार, तर दुसरी सून प्रेमाने नात्यांची ज्योत उजळणार' या मालिकेचं नाव आहे, 'दीप ज्योती. या दोन्ही मालिकांचे एआय प्रोमो प्रदर्शित करण्यात आलेत. या मालिकांमध्ये कोणते कलाकार असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. या मालिका कधी सुरू होणार यासाठी कोणती मालिका निरोप घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तर लवकरच झी मराठीवर ‘झी मराठी दुपार’ हा सेगमेंट सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारच्या स्लॉटला देखील काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता आहे. सध्या दुपारच्या कालावधीत ‘लागिरं झालं जी’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या दोन जुन्या एव्हरग्रीन मालिकांचं पुन:प्रसारण करण्यात येत आहे.
झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या मालिकांचे प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झालेत. लवकरात लवकर या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला याव्यात अशी नेटकऱ्यांची इच्छा आहे.
त्यांचं शरीर साथ देत नव्हतं... कसे होते इरफान खान यांचे शेवटचे दिवस; डिझायनर म्हणाली, 'कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी कधीही....