स्टार प्रवाह जरा जपून! झी मराठीवर नव्या मालिकांचं वादळ; वाहिनीने दाखवले AI प्रोमो, काय आहेत मालिकांची नावं?
esakal December 30, 2025 02:45 AM

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका सुरू झाल्या. काही मालिका हिट ठरल्या तर काही मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र गेले काही वर्ष टीआरपी यादीवर स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व दिसून आलं. आता अखेर दोन वर्षांनी स्टार प्रवाहच्या वर्चस्वाला धक्का देत झी मराठीच्या मालिकांनी टीआरपी यादीत टॉप १० मध्ये एंट्री घेतलीये. त्यातच आता झी मराठीने प्रेक्षकांना आणखी एक गुडन्यूज दिलीये. लवकरच झी मराठीवर एक नाही दोन नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. नुकतेच झी मराठीने या मालिकांचे प्रोमो शेअर केलेत. जे पाहून प्रेक्षक खुश झालेत.

काही दिवसांपूर्वी झी मराठीने वल्लरी विराजच्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेची घोषणा केली. मात्र या मालिकेची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्याआधीच वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केलीये. ‘झी मराठी’वर नव्याने सुरू होणाऱ्या दोन मालिकांपैकी पहिल्या मालिकेचं नाव आहे ‘सनई चौघडे’. या प्रोमोमध्ये मुख्य नायिका म्हणते, 'तुम्हाला सांगते, मुलं शोधणं इतकं कठीण झालंय…. हे सगळं करून जर मुलगा सापडला तर दोघांचे विचार जुळतील का? आणि जरी जुळवून घ्यायची तयारी दाखवली तरी नातं टिकेल का? याची खात्री नसते. अहो आम्हाला तर चार मुली आहेत पण, त्या आम्हाला जड नाहीत बरं का…पण आई म्हणून काळजी असतेच ना! प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. वाजंत्री मुहूर्तावरच वाजणार!”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)