IND vs SL : टीम इंडिया विजयी पंचसाठी सज्ज, श्रीलंका शेवटचा सामना तरी जिंकणार का?
GH News December 30, 2025 03:10 AM

श्रीलंका वूमन्स क्रिकेट टीम 2025 या वर्षातील शेवटचा आणि टी 20I सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका वूमन्स टीम यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यानंतर 4-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेला 5-0 अशा फरकाने लोळवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला सलग 4 सामने गमावणारी श्रीलंका शेवटचा सामना जिंकून अपमानजनक पराभव टाळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. हा पाचवा आणि अंतिम टी 20I सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल? हे सविस्तर जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना कधी?

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना मंगळवारी 30 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना कुठे?

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणारा या मालिकेतील सलग आणि एकूण तिसरा टी 20I सामना असणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका पाचव्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध श्रीलंका पाचव्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा टी 20I सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

श्रीलंका लाज राखणार?

श्रीलंकेसाठी हा पाचवा आणि अंतिम सामना म्हणजे प्रतिष्ठेचा विषय आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना पहिल्या 4 सामन्यात क्वचित अपवाद वगळता काही खास करता आलं नाही. श्रीलंकेने भारतासमोर गुडघे टेकले. त्यामुळे श्रीलंकेवर मालिका पराभवाची वेळ ओढावली. त्यानंतर सलग चौथ्या सामन्यातही पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता कर्णधार चमारी अट्टापट्टू श्रीलंकेला पाचव्या सामन्यात विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरणार की महिला ब्रिगेड हरमनप्रीत कौर हीच्या कॅप्टन्सीत विजयी पंच लगावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.