KRK25B03713
फोटो करकंब : येथे चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सव प्रसंगी कीर्तन करताना ज्ञानेशबुवा धानोरकर.
शरीरावर प्रेम करण्यापेक्षा भगवंतावर करा
ज्ञानेशबुवा धानोरकर; करकंब येथे चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. ३० : शरीरावर प्रेम करण्यापेक्षा भगवंतावर प्रेम करा. तो सर्व चिंता दूर करतो. त्यासाठी मनी भाव असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा पांडुरंगाचरणी भाव ठेवून नामस्मरण करावे, असे आवाहन ज्ञानेशबुवा धानोरकर यांनी नारदीय कीर्तनातून केले.
करकंब कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प हभप धानोरकर यांनी गुंफले. सुरवातीला आई चौंडेश्वरी मातेची पूजा आणि दीप प्रज्ज्वलन हभप धानोरकर, बाळासाहेब वास्ते, संजीवकुमार म्हेत्रे, प्रभाकर रसाळ, विठ्ठल साठे, माऊली पिसे, यांचे हस्ते झाले. त्यानंतर कीर्तनाला सुरवात झाली.
पूर्वरंगामध्ये संत नामदेव महाराज यांच्या सुंदर अभंगावर निरूपण केले. उत्तर रंगांमध्ये हनुमान सेवा आख्यान सांगत सेवेचे महत्त्व विशद केले. त्यांनी अतिशय सुंदर दृष्टांत सांगत व सुंदर पदे गात करकंबकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत हार्मोनिअम गंगाधर देव, तबला ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ माऊली पिसे यांची लाभली.