बॉलिवूड म्हणजे चमचमणारी दुनिया. या दुनियेत कित्येक व्यक्ती आपलं नशीब घेऊन येतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर इथे अनेक कलाकार रंकाचे राव झाले. प्रचंड प्रसिद्धी, पैसा आणि तितकीच मेहनत असं गुरुमंत्र असलेल्या बॉलिवूडमध्ये कुणाला कधी लॉटरी लागेल सांगू शकत नाही. मात्र सगळ्याच कलाकारांना ही यशाची पायरी चढायला मिळते असं नाही. आमिर खानचा भाचा असणारा अभिनेता इमरान खान याने बॉलिवूडबद्दल खुलासा केला आहे. रणवीर सिंग आणि रणबीर कपूरसारखे कलाकार एका सिनेमासाठी किती मानधान घेतात याबद्दल सांगितलं आहे.
इमरान लवकरच 'हॅपी पटेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. यानिमित्ताने समदीश भाटियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना इमरान खान म्हणाला, "जर तुम्ही आजच्या काळात थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करणारे ए-लिस्ट कलाकार असाल, तर तुम्ही प्रत्येक चित्रपटासाठी किमान ३० कोटी रुपये मानधन घेता. माझ्या वयाचा कोणताही अभिनेता, मग तो रणबीर कपूर असो, रणवीर सिंग असो किंवा शाहिद कपूर हे सर्व ३० कोटींपेक्षा कमी घेत नाहीत. जर यापैकी कोणीही त्यापेक्षा कमी मानधन घेत असेल, तर मला नक्कीच आश्चर्य वाटेल".
तो पुढे म्हणाला, 'आजही, कास्टिंग पूर्णपणे बजेटवर आधारित आहे. त्याचा अभिनेत्याशी काहीही संबंध नसतो. तुम्ही भूमिकेसाठी योग्य आहात की नाही याची कोणालाही पर्वा नसते. ते फक्त विचार करतात, मी यातून किती पैसे कमवू शकतो?". इमरान खानने उदाहरण देताना 'मटरू की बिजली का मंडोला' चित्रपटाचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "सुरुवातीला या चित्रपटासाठी अजय देवगणची निवड झाली होती. पण, अजय देवगणने चित्रपट सोडल्यानंतर निर्मात्यांनी मला कास्ट केले. त्यांना माझ्याकडून पुरेसे पैसे मिळाले, त्यांचा उदरनिर्वाह झाला.' एकूणच मोठ्या कालाकारांना ३० कोटींहून जास्त मानधन मिळतं. तर आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे कलाकार ६० ते ८० कोटींचं मानधन घेतात.
रामानंद सागर यांना धमकावायला चक्क काठ्या घेऊन गेलेले छोटेसे लव-कुश; दोघांना साप दाखवून केले जायचे सीन