नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध मॉलमध्ये आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी दिवे, सजावट आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे मॉल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक या विविधरंगी आकर्षक रोशणाईबरोबर सेल्फीचा आनंद घेत आहेत. चिंचवडमधील एल्प्रो मॉलमध्ये प्रवेशद्वारावरील रोशणाई व प्राण्यांच्या प्रतिकृती लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, वाकडमधील फिनिक्स मॉल येथील संगीत आधारित रोशणाई डोळ्यांचे पारणे फेडत आहे. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)