छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीचा विषय आहेत. काही मालिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. तर काही मालिका लगेच विस्मरणात जातात. या मालिकांमध्ये टीआरपीची चढाओढ पाहायला मिळते. त्यामुळेच मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट दाखवण्यात येतात. अशाच एका मालिकेत आता भलामोठा ट्विस्ट आला आहे. झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत आता सगळ्यात मोठं सत्य उघड होणार आहे. सावलीचं खरी गायिका असल्याचं सत्य आता उघड होणार आहे.
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत सावली ही सुरुवातीपासूनच सुंदर गाते असं दाखवण्यात आलं. मात्र तिच्या आवाजाचा गैरफायदा तिचीच शिक्षिका घेते. गुरुदक्षिणा म्हणून ती सावलीचा आवाज स्वतःच्या मुलीचा म्हणून दाखवते. सावलीचं लग्न होतं मात्र मालिका सुरू झाल्यापासून सावलीच्या आवाजचं सत्य कधी बाहेर येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता अखेर मालिकेत ती घटका समीप आलीये. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय. ज्यात सारंग सावलीच्या आवाजाचं सत्य उघड करतोय.
View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तारा स्टेजवर गाणं सादर करत असताना अचानक ममागचा दरवाजा उघडतो. जिथे सावली स्वतःच्या आवाजात गाणं गात असते हे उपस्थित प्रेक्षकांच्या लक्षात येतं. त्यामुळे तारा केवळ ओठांची हालचाल करून दाखवत असल्याचं जगासमोर येतं. त्यानंतर सारंग सावलीला घेऊन रंगमंचावर येतो. त्यानंतर सावली तिच्या हातात बांधलेला धागा सोडून भैरवी वजेच्या हातात देते आणि मी आता या वचनातून मुक्त झाली असं म्हणते. हे पाहून नेटकरी प्रचंड खुश झालेत.
नेटकऱ्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केलाय. एकाने लिहिले, बापरे आज मालिका बघण्याचा फळ आम्हाला मिळते हे सत्य समोर येण्यासाठी मी ही सिरियल बघत होते रोज, दुसऱ्याने लिहिले, सत्याचा चेहरा समोर येणं गरजेच कितवर मुखवटा नेणार, आणखी एकाने लिहिले की, बाबा रे आजची एकादशी पावली वाटतं, विठू माऊलीच्या कृपेने आज हा प्रोमो आला. आता मालिकेत नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
ना मोठा स्टार, ना नाच-गाणं, 'धुरंधर', 'छावा'ला मागे टाकत ५० लाखांच्या चित्रपटाने कमावला 24000% नफा, केली छप्परफाड कमाई