मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?
Saam TV January 01, 2026 04:45 AM

सध्या राज्यभरात 29 महापालिकेचे रणसंग्राम सुरू आहे. मंगळवार (दि30) रोजी अर्ज भरण्याचा शेवटची तारीख होती. याच दिवशी नाशिकमध्ये मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरे गटातून आलेले सुधाकर बडगुजर यांच्याच घरातील 3 सदस्यांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहे.

Cabinet Decision: वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळात अंबादेवी संस्थानबाबत मोठा निर्णय

महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उधळला आहे. भाजपचे एकनिष्ठ आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला आहे.

Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, भाजपने बड्या नेत्याला पदावरून तडकाफडकी हटवलं

मुकेश शहाणे यांच्याआधी भाजप नेते सुधाकर बडगुजर यांचा पुत्र दीपक बडगुजर यांनी अर्ज भरल्यामुळे एबी फॉर्म असूनही शहाणे यांचा अर्ज पात्र ठरला नाही. तसेच सिडको भागातील भाजपच्या दोन माजी नगरसेवकांचा अर्जही बाद करण्यात आला आहे.माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्जही बाद ठरल्याने भाजपच्या गोटात प्रचंड नाराजीचा सुर आहे. याउलट, सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांचा अर्ज पात्र ठरला आहे.

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिंदेसेनेला मोठा धक्का; महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'; हाती घेतलं कमळ

प्रभाग २५ मध्ये सुधाकर बडगुजर, पत्नी हर्षा बडगुजर आणि पुत्र दीपक बडगुजर निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्याचबरोबर, दीपक बडगुजर प्रभाग २९ मधूनही उमेदवारी अर्ज पात्र ठरल्यामुळे, ते भाजपकडून दोन प्रभागात लढणार आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना मुकेश शहाणे यांनी म्हटले की, पक्षाने मला एबी फॉर्म दिला होता, पण काहींनी चोरी करून फॉर्म भरला. विधानसभेची पुनरावृत्ती केल्याशिवाय मी राहणार नाही. अपक्ष लढणार आहे. त्यांनी आपले नाव न घेता दीपक बडगुजर यांच्यावर निशाणा साधला. या निर्णयामुळे नाशिकमध्ये भाजपच्या गोटात राजकीय तणाव वाढल्याचे समोर आले आहे. मुकेश शहाणे आणि भाग्यश्री डोमसे हे दोघेही आमदार सीमा हिरे यांचे जवळचे कार्यकर्ते आहे. तसेच बडगुजर यांच्या घरात तीन तिकिटे दिल्याने आमदार हिरे आणि त्यांचे समर्थक हे भाजप कार्यालयात दाखल झाले होते. याठिकाणी काही काळ तणावाची स्थिति निर्माण झाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.