बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबाराने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ
अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी
दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी झाडल्या गोळ्या
सुशील थोरात, साम प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याची हत्या झाली आहे. भर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटी जहागिरदारला गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर जहागिरदारला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.
श्रीरामपूरयेथे कब्रस्तानातून बाहेर पडल्यानंतर बंटी जहागिरदारवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जहागिरदारवर कब्रस्तानातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेकांनी हल्लेखोरांची व्हिडिओ देखील बनवल्याचं दिसत आहे. गोळीबार झाल्यानंतर परिसरात पळापळ सुरू झाली.
Gadchiroli Crime: पती ठरला प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला गेम, नंतर रचला अपघाताचा बनावगोळीबाराच्याघटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात बंटी जहागीरदार याचा नाव होतं. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट झाले नाहीये. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तेथून काडतुसे गोळा करण्यात आली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना करण्यात आली आहेत.