'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचा धक्कादायक प्रोमो समोर आला आहे.
जानकी अन् हृषीकेशच्या लग्नात मकरंद अडचणी घेऊन येतो.
मालिकेच्या नवीन प्रोमोवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
नवीन वर्षात मराठी मालिकांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर दोन मालिका सुरू होणार आहेत. यात 'तुझ्या सोबतीने' आणि 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकांचा समावेश आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. जो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत जानकी आणि हृषीकेशची लग्नाआधीची गोष्ट दाखवत आहे. हा भाग आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. हृषीकेश जानकीला लग्नासाठी विचारतो आणि जानकी देखील होकार देते. मात्र जानकी आणि हृषीकेशच्या मध्ये मकरंद नावाचे वादळ येते. कारण मकरंदला जानकी खूप आवडते.
नवी प्रोमोमध्ये तु्म्ही पाहू शकता की, मकरंद डोंगराच्या कड्यावर उभा राहून हृषीकेशला मारण्याचा प्रयत्न करत असतो, तेवढ्याच जानकी मकरंदशी लग्नकरण्यास तयार असल्याचे बोलते. जानकी मकरंदच्या जवळ जाऊन त्याच्या हातातील बंदूक घेण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत मकरंदचा पाय सरकतो आणि तो दरीतकोसळतो.
View this post on Instagram
प्रोमोच्या शेवटी मकरंदची बहीण ऐश्वर्याला जानकी, हृषीकेश आणि मकरंद यांच्या भूतकाळाबद्दल सांगते आणि म्हणते की, 'हे मंगळसूत्र जानकीच्या गळ्यात पडणारच' आता 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नेमकं काय होणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहे. प्रेक्षक मालिकेसाठी उत्सुक आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या नवीन प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "जानकीच्या वर्तमानावर भूतकाळाचं सावट..." मालिकेचे विशेष भाग 5 आणि 6 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
Aamir Khan-Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोवर झाली शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत सांगितलं नेमकं काय झालं?