तासगाव : अफगाणिस्तानातून बेदाणा आणून त्यावर प्रक्रिया करून भारतीय बेदाणा म्हणून बॉक्स भरणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्यांचा संचालक मंडळाच्या सभेत परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे बाजार समिती सभापती युवराज पाटील यांनी जाहीर केले.
या प्रकरणी बाजार समिती, द्राक्ष बागायतदार संघ, बेदाणा असोसिएशन व्यापारी आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे अफगाणिस्तानातून बेदाणा आयात प्रकरणी समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Sangli Raisin : ‘भारतीय’ नावाचा मुखवटा, आतून चीनी बेदाणा! तासगाव बाजारातील घोटाळ्याने शेतकरी संतप्तया बैठकीसाठी बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष दत्ताजी पाटील, बेदाणा असोसिएशनचे अशोक बाफना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांच्यासह बाजार समितीचे संचालक कुमार शेटे, महादेव पाटील, खंडू पवार, रेखा पाटील, प्रभारी सचिव चंद्रकांत कणसे यांच्यासह संचालक, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. यावेळी बेदाणा उत्पादक आक्रमक झाले होते.
परदेशी बेदाणा भारतीय बेदाणा म्हणून खपवू नका. असे प्रकार करून बेदाण्याचे दर पाडले जात आहेत. शेतकरी अडचणीत आहे, त्याला आणखी अडचणीत आणू नका, असे दत्ताजी पाटील यांनी द्राक्ष बागायतदारांतर्फे आवाहन करून बाजार समितीकडून दिले जाणारे ‘त्या’ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली.
Solapur News: द्राक्षबागायतदार संघ आक्रमक! पाच हजार टन बेदाणा भारतात आल्याचा संशय, सांगलीत चौकशी सुरू, अन्यथा आंदोलनाची तयारी!‘‘आम्ही अशा प्रकारांना पाठीशी घालणार नाही. अफगाणी बेदाणा हा भारतीय बेदाणा म्हणून विकणे गैर आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’’ असेही अशोक बाफना म्हणाले.
‘‘बैठकीला बोलवूनही ते शीतगृह चालक उपस्थित नाहीत. त्यांनी बाजार समिती, शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी,’’ अशी मागणी आर. डी. पाटील यांनी केली. व्यापाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा महेश खराडे यांनी इशारा दिला.
‘‘त्या’ बेदाणा व्यापाऱ्यांवर बाजार समिती कठोर कारवाई करेल. शिवाय ज्या व्यापाऱ्यांनी असा बेदाणा घेतला आहे, त्यांच्यावरही कारवाई करेल. बाजार समिती माहिती घेत आहे, कोणाचीही गय केली जाणार नाही. बाजार समिती शेतकरी आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहील,’’ असे सभापती पाटील यांनी चर्चेचा समारोप करताना सांगितले.
बेदाणा असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय बोथरा, सुदाम माळी, सतीश माळी, भूपाल पाटील द्राक्ष बागायतदार संघाचे सुरेश करगणे, पृथ्वीराज शिंदे, जयसिंग चव्हाण, जितेंद्र पाटील, मोहन पाटील उपस्थित होते.