ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! बायकोच्या अपहरणाचा प्लॅन नागराजच्या आला अंगाशी, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...
esakal January 09, 2026 04:45 PM

Star Pravah Tharla Tar Mag Serial: सध्या ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट आलेला पहायला मिळतोय. नागराज सुमन काकूला मारहाण करण्याचा आणि त्यांचं अपहरण करण्याचा प्लॅनमुळे चांगला गोत्यात आलाय. मालिकेत सुरुवातीला सुमनला मारहाण करण्यावरुन रविराज नागराजला खुप सुनवतो. पूर्णा आजीदेखील एका स्त्रीवर केलेल्या मारहाणीबद्दल नागराजला जाब विचारतात. घरातल्या सगळ्यांना नागराजची लाज वाटायला लागते. नागराजला सगळे सुमनचा पत्ता विचारतात. रविराज तर इतका संतापतो की, तो नागराजला जेलमध्ये पाठवायला तयार असतो. परंतु तरी देखील नागराज सुमनचं अपहरण केल्याचं मान्य करत नाही. उलट तो सुमन बद्दल असलेली खोटी काळजी सगळ्यांसमोर व्यक्त करतो.

इकडे रविराजला सुमनचं संरक्षण करु शकला नसल्याचं वाईट वाटतय. तर दुसरीकडे नागराज साजूकपणाचा आव आणत सगळ्यांची माफी मागतो. परंतु रविराज त्याला तंबी देऊन 'घराबाहेर पडायचं नाही' असं सांगतो. यावेळी नागराज सुमन कुठे असेल? कशी असेल? असं खोटं प्रेम व्यक्त करतो. परंतु घरातल्या सगळ्यांना नागराजवर संशय आलेला असतो.

दरम्यान इकडे प्रिया विचार करत की, नागराजनं नक्की काय केलय? त्यामुळे गार्डनमध्ये गेलेल्या नागराजच्या मागेमागे प्रिया जाते. नागराजला जाब विचारत म्हणते, तु सुमनला कुठं लपवलंय, तुम्ही त्यांचा खुन वगैरे तर केला नाही ना? यावर नागराज खुप भडकतो आणि प्रियाच्या गळा पकडतो. यावेळी प्रिया शांत होऊन पुन्हा नागराजला दोघे एकत्र येण्याचा सल्ला देते. प्रिया गेल्यावर नागराज विचारात पडतो की, सुमनच्या फोनचं लोकेशन तर माझ्या जवळ आहे. खरंच ते सुमनपर्यंत पोहचतील का?

View this post on Instagram

A post shared by Tharla Tar Mag (@tharla_tar.mag)