मालेगाव : येथील महानगरपालिका निवडणुकीत (Malegaon Municipal Election) बंडखोरी केल्यामुळे भाजपने दोन माजी महानगरप्रमुखांना पक्षांना निष्कासित केले आहे. माजी महानगरप्रमुख नितीन पोफळे यांनी बंडखोरी करत प्रभाग १० ड मधून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. तर, माजी महानगरप्रमुख विवेक वारुळे यांनी पत्नी दिपाली वारुळे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या आदेशानुसार पक्षाचे मालेगाव जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी दोघांना भाजपमधून निष्कासित केले आहे. व्यापारी आघाडीचे प्रदेश सहसंयोजक नितीन पोफळे यांनी प्रभाग १० ड मधून उमेदवारी मागितली होती. पक्षाने या जागेवर महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली.
Malegaon Municipal Election : मालेगावात भाजपची एमआयएमशी छुपी युती; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले....नाराज झालेल्या पोफळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढत बंडखोरी केली आहे. बंडखोरी करतानाच श्री. पोफळे यांनी प्रचारात भाजप नेत्यांची छायाचित्रे वापरली. माजी महानगरप्रमुख विवेक वारुळे यांच्या पत्नी दीपाली वारुळे प्रभाग ९ मधून इच्छुक होत्या. भाजपने त्यांच्याऐवजी राजश्री गीते यांना उमेदवारी दिली.
दीपाली वारुळे अपक्ष म्हणून उमेदवारी करीत आहेत. या दोन्ही बंडखोरांवर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या आदेशानुसार पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून जिल्हाध्यक्ष कचवे यांनी दोघांना पक्षातून निलंबित केले आहे.