मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Marathi January 12, 2026 12:25 AM

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरुन मुंबईकरांना (Mumbai) आवाहन केलं. आदित्य ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनीही विविध मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, केस लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंयअसे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल, अशा शब्दात राज ठाकरे मुंबईकरांना आवाहन केलं. तसेच, आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणे राजा ठाकरेंनी 2014 ते 2024 या गेल्या 10 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या (Gautam adani) वाढलेल्या संपत्तीचा हिशेब मांडला.

मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबईकरांना आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळला. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात पार पडली. सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही आधीच लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे अपक्षेप्रमाणे नियम ठाकरेंनी आपल्या लाव रे तो व्हिडिओ शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

मी या व्यासपीठावर लहान असताना अनेकदा आलो… सेनेची स्थापना झाल्यानंतर माझे आजोबा माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आई उपस्थित होत्या

खरतर आज माझे आजोबा प्रबोधन कार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आई हे चित्र पाहायला हवे होते…आम्ही जो लढा उभारलाय ते वरतून पाहत असतील…

आज खूप काही घेऊन आलोय… पोट भरून घरी जा…

काही जण तिकीट वाटपात नाराज झाले.. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो.. आपलेच आहेत… परत येतील… आत्ताच आहे ते जातील… गेलेले तर करत येतीलच

मी आणि उद्धव एकत्र आलॊ मुंबईवर आलेला हे संकट… एक डाव या सरकारकडून रचला जातोय

हिंदी सक्ती करत होते मी कडाडलो उद्धव ही कडाडला…

हिंदी सक्ती फक्त मराठी माणसाला चाचपडण होत… आली कुठून हिम्मत… कोणाला विचारायचं नाही जनता त्यांची किमत…

पैसे दिले की आम्ही विकत घेऊ आला कुठून विश्वास

गृहीत धरून टाकलाय तुम्हाला… बोगस मतदार आणि ईव्हीएम यंत्र प्रारंभ आहे

अकोट मध्ये भाजपने एमआयएम सोबत युती केली अंबरनाथ मध्ये भाजपने काँग्रेस सोबत युती केली… विनोद गंगणे नावाचा माणसाला तिकीट भाजपने दिले औषध रॅकेट मधला माणूस त्याला नाकावर टिचून तिकीट दिला

बदलापूर मध्ये बलात्कार चे आरोप असलेला तुषार आपटेला नगरसेवक केलं… येथे कुठून तुम्हाला हिम्मत?

अख्खी मुंबई विकायला काढली..

२०२४ लोकसभा निवडणुकी नंतर एका व्यक्तीने माहिती दिली माझी रिसर्च टिक कामाला लागली… आत्ता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे…

आता हे दाखवल्यानंतर तुम्हाला भीती नाही वाटली तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या… आपण डोळेझाक करून टाकतोय

मी २०१४ चा भारताचा मॅप दाखवतो –

गौतम उंबरठ्याच्या खाली प्रकल्प किती होते… पंतप्रधान मोदी होण्याआधी… आणि नंतर गौतम अदानी कुठे आहेत… तुम्हाला नाही धक्का बसला तर बघा

हे फक्त १० वर्षातले आहे…

जगात कोणता व्यक्ती नसेल एवढा १० वर्षात श्रीमंत झाला

एकाच माणसाला एवढ्या गोष्टी दिल्या

जगतलानंबरचा सिमेंट उद्योग मध्ये मोठा झालेला अदानी आहे… २०१४ आधी हा सिमेंट उद्योगात कुठेच नव्हता…

MMR प्रदेश मध्ये काय केलं ते मी वाचून दाखवतो …

तुम्हाला कळतंय काय चाललाय

वाढवण बंदर येताय मी म्हटलं चांगला आहे… नंतर तिथे विमानतळ करताय कशाला मुंबई विमानतळ मालवाहू तिकडे शिफ्ट करणार

मुंबई विमानतळ जागा यांना हवी आहे

स्वकी्यांचा घात करणारी मुले फक्त पक्षात नसते राजकीय पक्षात सुद्धा असते…

वाढवण ला लागून गुजरात आहे

त्यासाठी पालघर हातात घ्यावा लागेल… ठाण्याचा भाग हातात घ्यावा लागेल… मुंबई गुजरात ला कशी जोडयाची याची लांब मुदत प्लॅन प्रारंभ आहे

जे विधानसभा केलं ते हे आत्ता सुद्धा करणार

देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना जेल मध्ये टाकला होता आतां मांडीला मांडी लावून बसले

अजित पवार यांचे बैलगाडी भर पुरावे यांनी आणले होते…

उत्तर भारतातला कोणीतरी म्हणाला BmC मध्ये उत्तर भारतीयांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कोल्हापूर सातारा ह्या बाहेरच्या लोकांना येथे नोकऱ्या नको म्हणतात

कोल्हापूर सातारा मधले लोक तुम्हाला बाहेरचे लोक…

यांचा नेता कृपा शंकर सिंग म्हणतो उत्तर भारतीय महापौर बसेल… तुम्ही बोलू शकता का तिकडे जाऊन

मुंबईत रसमलाई आली होती… म्हणतो मुंबई आणि महाराष्ट्र चा काय संबंध?

भडव्या तुझा काय संबंध आहे येथे यायचा?

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हटाव लुंगी बजाव पुंगी…

एकटे असलो तरी पुरे आहोत

हा धोका किती भयंकर आहे… बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे मी २०१८ ला वाचून दाखवला होत…

यूपी आणि बिहार च्या लोकांनी समजून घ्या हिंदी तुमची भाषा नाही

माझा भाषेवर राग नाही…पण तुम्ही लादणार असाल तर लाथ मारू

सगळ्या बाजूने सपन्न असलेला महाराष्ट्र मध्ये येऊन चावे तुमचे घेताय.. उठा म्हणताय आम्ही येतोय…
रिअल इस्टेट खरी म्हणजे जमीन… जमीन आणि भाषा गेली कीं तुम्ही संपले…
आज हे संकट तुमच्या उंबरठ्यावरती आलाय… कोकण पट्टी रिकामी करताय
कुठे चाललीये बुलेट ट्रेन… माझा त्यावेळी सुद्धा विरोध होता… बुलेट ट्रेनचा स्टेशनचा शेवटचा स्टेशन बघा…
तुमचं अस्तित्व नसेल तर काय चाटायच्या महापालिका…
तुमची काय किमत करून ठेवली या माणसांनी
पैसे फेकले कीं विकला जातो
बोली लावणारे कोण? आमचेच… काय परिस्थिती आलीये
मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे… आज चुकला तर मुकलात…
ह्या मराठीसाठी महाराष्ट्र साठी एक व्हा…
इतक्या लोकांच्या तपस्याने मुंबई मिळाली… पुतळे काय म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध राहायला..आणि मुंबई गमवली

सत्ता नसताना सुद्धा लाफे मारलेच ना?
सकाळी ६ वाजता BLA जे नेमलेत ते मतदान दिवशी तयार राहा… सतर्क राहा बेसावध राहू नका… दुबार मतदार आला तर त्याला सकाळी ६ वाजता फोडून काढा

हेही वाचा

Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.