सुंदर, कृष्णा OUT; रेड्डी, अर्शदीप सिंग IN… न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल ट
Marathi January 12, 2026 05:25 PM

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे : भारताने वडोदऱ्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता या मालिकेतील दुसरा सामना बुधवार, राजकोट येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला असून, त्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

राजकोटची खेळपट्टी आणि रणनीती

राजकोटची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. येथे धावांचा पाऊस पडतो. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, मात्र जसजसा सामना पुढे जातो तसतशी ही खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजीस अनुकूल होते. दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांना थोडीशी पकड आणि टर्न मिळण्याची शक्यता असते, पण सपाट पिचवर यश मिळवण्यासाठी त्यांना अत्यंत अचूक टप्पा आणि लाईन राखावी लागेल.

भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल संभव

सुंदरच्या अनुपस्थितीत राजकोट वनडेसाठी भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. सुंदरच्या जागी नितीश रेड्डीला संधी दिली जाऊ शकते. नितीश खालच्या फळीत फलंदाजी करू शकतो आणि गरज पडल्यास वेगवान गोलंदाजीचा पर्यायही देतो. दुसरा बदल प्रसिद्ध कृष्णाच्या रूपात होऊ शकतो. पहिल्या सामन्यात कृष्णा फारसे प्रभावी ठरले नव्हते, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये त्यांना मोठा फटका बसला होता. त्याचमुळे न्यूझीलंडचा स्कोअर 300 धावांपर्यंत पोहोचला. जर प्रसिद्ध कृष्णाला वगळण्यात आले, तर त्यांच्या जागी अर्शदीप सिंगला संघात संधी मिळू शकते.

भारतासाठी डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील. त्यानंतर फलंदाजी क्रमात विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असेल. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज आपली जागा कायम ठेवतील. हर्षित राणाने पहिल्या वनडेत महत्त्वाची 27 धावांची खेळी करताना 2 विकेट्सही घेतल्या होत्या, तर मोहम्मद सिराजची गोलंदाजीही प्रभावी ठरली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही या तिघांकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Team India Playing XI vs New Zealand 2nd ODI) – रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 : भारत-बांगलादेश वादात पाकची एन्ट्री, पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी ICCकडे थेट प्रस्ताव, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.