जगभरात कोट्यवधी लोक आवडीने मद्यप्राशन करतात. बहुसंख्य लोकांना बिअर हाच मद्याचा प्रकार जास्त आवडतो. परंतु मद्याची बॉटल नेहमीच हिरव्या किंवा तपकिरी रंगात दिली जाते. यामागे नेमकं कारण काय आहे? हे अनेक लोकांना माहिती नाही.
बिअर ही अनेकदा तुम्हाला हिरव्या किंवा तपकिरी काचेच्या बॉटलमध्येच पाहायला मिळते. बिअर कधीच पारदर्शक काचेच्या बॉटलमध्ये ठेवली जात नाही. त्यामागे काही कारणं आहेत. हिरव्या आणि तपकिरी रंगाचा संदर्भ हा बिअरची चव, तिची गुणवत्ता याच्याशी आहे.
जुन्या काळात अगोदर बिअर मताीच्या भांड्यात ठेवली जायची. परंतु नंतरच्या काळात बिअर काचेच्या बॉटलमध्ये ठेवण्यास सुरुवात झाली. बिअरचा खप हा जगभरात आहे. त्यामुळे एका देशात उत्पादित केलेली बिअर ही दुसऱ्या देशात पाठवली जाऊ लागली. परंतु या प्रवासादरम्यान काचेच्या बॉटलमध्ये ठेवण्यात येत असलेली बिअर खराब होऊ लागली. तिची चव बिघडू लागली.
परंतू बिअरची बॉटल पारदर्शक असण्याऐवजी हिरव्या किंवा तपकिरी रंगाची असेल तर सूर्याची यूव्ही किरणं परावर्तीत होतात. ते बॉटलमध्ये असलेल्या बिअरपर्यंत कमी प्रमाणात जातात. म्हणूनच बिअर लवकर खराब होऊ नये म्हणून बिअरच्या बॉटलचा रंग हा तपकिरी किंवा हिरवा असतो. (टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आलेला आहे. मद्यप्राशन करू नये.)