मुंबई इंडियन्स टीमने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोेसमातील सहाव्या सामन्यात मंगळवारी 13 जानेवारीला गुजरात जायंट्सला पराभूत केलं. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 193 धावांचं आव्हान हे 19.2 षटकांत 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने या विजयासह चौथ्या हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. मुंबईने यासह सलग 2 सामने जिंकणाऱ्या गुजरातच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला. मुंबईला विजयापर्यंत पोहचवण्यात सर्व 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर हीने मुंबईला विजयी करण्यात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. हरमनप्रीत कौर हीने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला विजयी केलं. हरमनप्रीतने 43 बॉलमध्ये 71 धावा केल्या. हरमनप्रीतने या खेळीसह इतिहास घडवला. हरमनने या खेळीच्या जोरावर मोठा विक्रम मोडीत काढला.