Shiv Thakare Wedding: टेलिव्हिजन आणि बिग बॉस फेम शिव ठाकरेने त्याच्या लग्नाबद्दलच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. मंगळवारी, बिग बॉस फेम शिवने खुलासा केला की, ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत नवरदेवाच्या वेशात दिसत होता, तो त्याच्या आगामी कामांपैकी एक आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शूटिंगचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "अखेर... २०२६ चे पहिले शूटिंग".
नवीन व्हिडिओमध्ये, शिव ठाकरे त्या मिस्ट्री गर्लसोबत सप्तपदी घेताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्यावर आणि त्या महिलेवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहेत. त्याचवेळी व्हिडिओमध्ये एक कॅमेरामन तो प्रसंग शूट करतानाही दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शिवने 'चलो पॅक अप' असेही लिहिले आहे. यामुळे त्याने अजून लग्न केले नसल्याची स्पष्ट होते.
Kriti Sanon: क्रिती सॅनन संतापली; विमानतळावरील पापाराझींची 'ती' कृती पाहून अभिनेत्रीला राग अनावरशिव ठाकरेच्या लग्नाच्या अफवा कशा पसरल्या?
काल, शिव ठाकरेने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्याचे चाहते आणि मित्रांना धक्का दिला होता. तो फोटो एखाद्या मराठी लग्न समारंभातील असल्यासारखा दिसत होता. त्या फोटोमध्ये, नवरदेवाच्या वेशात असलेला शिव एका मिस्ट्री गर्लसोबत पोज देताना दिसत होता. पण त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. तो फोटो शेअर करताना शिवने 'फायनली' असे लिहिले होते. ज्यामुळे ही चर्चा सुरू झाली की या रिॲलिटी टीव्ही स्टारने कदाचित गुपचुप लग्न केले आहे.
Payal Gaming Private Video: प्रसिद्ध यूट्यूबरचा MMS व्हायरल, 19 मिनिटांचा धक्कादायक व्हिडिओ; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्याView this post on InstagramA post shared by Shiv Thakare (@shivthakare9)
शिवने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, त्याचे चाहते आणि मित्रांनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या. भारती सिंगने पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले, "हे कधी झालं भावा अभिनंदन." पूनम पांडेनेही लिहिले, "अभिनंदन." जयंती वाधधारेने आश्चर्याने "काय." अशी कमेंट केली. माही विज, रिधिमा तिवारी, आकांक्षा पुरी आणि इतरांनीही शिवला शुभेच्छा दिल्या होत्या.