मकर संक्रांती हा एक अतिशय खास हिंदू सण आहे, जो दरवर्षी १४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे प्रतीक आहे, जो हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात दर्शवितो. हा दिवस नवीन ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि विविध प्रादेशिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा एक खास पैलू म्हणजे खास पदार्थ तयार करणे. हे पदार्थ केवळ स्वादिष्टच नाहीत तर आरोग्यदायी देखील आहे, जे हिवाळ्याच्या काळात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात.
१. तिळाचे लाडू
हे संक्रांतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे लाडू पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देतात.
साहित्य
पांढरे तीळ, गूळ, शेंगदाण्याचा कूट, वेलची पूड आणि थोडे तूप.
कृती
तीळ मंद आचेवर भाजून घ्या. कढईत तूप घालून गुळाचा पाक तयार करा. पाकात भाजलेले तीळ, शेंगदाणा कूट आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करा आणि गरम असतानाच त्याचे छोटे लाडू वळा.
२. गुळाची पोळी
संक्रांतीला गुळाची पोळी आवर्जून बनवली जाते. ही पोळी चवीला अप्रतिम आणि खुसखुशीत लागते.
साहित्य
गव्हाचे पीठ, बेसन, गूळ, भाजलेले तीळ, खसखस, वेलची पूड आणि तूप.
कृती
गूळ, तीळ आणि खसखस एकत्र करून त्याचे सारण तयार करा. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यात हे सारण भरा आणि पोळी लाटून तुपावर खमंग भाजून घ्या.
३. तिळाची वडी
ज्यांना लाडू वळायला कठीण वाटतात, त्यांच्यासाठी तिळाची वडी हा उत्तम पर्याय आहे.
साहित्य
तीळ, गूळ, दाण्याचा कूट आणि तूप.
कृती
गुळाचा पाक करून त्यात सर्व साहित्य मिसळा आणि हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटावर थापून त्याच्या वड्या पाडा.
४. ताजे शेंगदाणे आणि गूळ
मकर संक्रांतीला भाजलेले शेंगदाणे आणि गूळ खाणे ही देखील एक लोकप्रिय परंपरा आहे.
साहित्य
ताजे शेंगदाणे आणि गूळ.
कृती
शेंगदाणे एका तव्यावर भाजून गुळासोबत खाल्ले जातात. शेंगदाणे आणि गूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे; ते हिवाळ्यात शरीराला उष्णता प्रदान करतात आणि उर्जेची पातळी राखतात.
५. गाजर हलवा
गाजर हलवा विशेषतः हिवाळ्यात, मकर संक्रांतीच्या वेळी बनवला जातो.
साहित्य
गाजर, दूध, साखर, तूप, सुकामेवा.
कृती
किसलेले गाजर दुधात शिजवा, नंतर साखर आणि तूप घालून परतवून घ्या. आता सुक्यामेवांनी सजवा. गाजर हलवा व्हिटॅमिन ए आणि लोहाने समृद्ध आहे, जो शरीराला केवळ उष्णता प्रदान करत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Makar Sankranti Special Tilgul Poli Recipe मकर संक्रांतीला चटकन तयार करा गुळाची पोळी
Edited By- Dhanashri Naik