'जिथं मतदान केलं त्याच्या बाहेरच ही अवस्था' शशांक केतकरने दाखवली ठाण्याची परिस्थिती, म्हणाला...'कोणत्याही पार्टीचा उमेदवार...'
esakal January 15, 2026 04:45 PM

Marathi actor speaks on civic issues after voting: अभिनेता शंशाक केतकर याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सार्वजनिक प्रश्न मांडत असतो. अनेकवेळी रस्त्यावरील खड्डे, कचरा, ट्राफिक यावर बेधडक बोलताना पहायला मिळतो. दरम्यान अशातच आज राज्यात 29 महापालिकांचं मतदान होत आहे. दरम्यान अभिनेता शंशाक केतकरने देखील मतदान केलं. यावेळी त्यानं मतदान केंद्राबाहेरील सत्य परिस्थिती दाखवत राग व्यक्त केलाय.

शंशाक केतकरनं ठाणे इथं मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी बोटावरची शाई दाखवत तो म्हणाला की, 'ज्या शाळेत मी आज मतदान केलं, त्या शाळेच्या बाहेरची ही अवस्था आहे.' तसंच यावेळी त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शाळेबाहेर टाकलेला कचऱ्याचा ठिगारा सुद्धा दाखवला. तसंच स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याने संताप देखील व्यक्त केलाय.

त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं की, 'कोणत्याही पार्टीचा उमेदवार उद्या निवडून आला तरी स्वच्छता या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही, पुढाकार घेत नाही. आता नागरिक सुद्धा याकडे दुर्लक्ष करताय, याची खात्री आहे. हे माझं मत नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. ठाण्यातल्या इंटरनॅशनल शाळेच्या दारातील ही अवस्था आहे. घाण, प्रदुषण फसवणूक हे चालणार नाही. आदर हवा.' असं कॅप्शनमध्ये म्हटलय.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)