Mukesh Ambani Reliance : भारतासह संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ओळखले जाणारे मुकेश अंबानी आता १०० बिलियन डॉलर क्लबमधून बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, त्यांची संपत्ती सध्या ९९.६ बिलियन डॉलर आहे.
विशेष बाब म्हणजे, यावर्षी मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये तब्बल ८.१२ बिलियन डॉलर, म्हणजे सुमारे ७.३२ लाख कोटी रुपयांची घाट झाली आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे.
Gold Rate Today : सहा दिवसांनी सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; खरेदीची संधी? पाहा तुमच्या शहरातील आजचे भाव सर्वाधिक घट कुणाची?एवढी मोठी घट होऊनही एकूण संपत्ती घटण्याच्या यादीत मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यापेक्षा मोठा घाट हा मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे. झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ९.८४ बिलियन डॉलरची घट झाली असून एकूण संपत्ती आता २२३ बिलियन डॉलर झाली आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आले आहेत.
इलॉन मस्क नंबर १ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहेत. यावर्षी त्यांची संपत्ती २०.९ बिलियन डॉलरने वाढली आहे, आणि आता त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत ६४० बिलियन डॉलर आहे. तर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांची संपत्ती सध्या ८१ बिलियन डॉलर आहे आणि ते यादीत २१ व्या क्रमांकावर आहेत.
New IPO : सचिन तेंडुलकर ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या कंपनीचा 500 कोटींचा IPO लवकरच! जाणून घ्या डिटेल्स... तिमाही निकालांकडे नजरमुकेश अंबानींच्या संपत्तीतील घट आणि शेअर्सवरील परिणामामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता कंपनीच्या तिसऱ्या तिमाही निकालांकडे लागले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल १६ जानेवारीला जाहीर करणार आहे. अंदाजानुसार, कंपनीच्या महसुलात मागील तिमाहीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे.