रत्नागिरी : कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला आहे. कोकणातील सात जिल्ह्यांत १६ ऑक्टोबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत वनविभाग आणि महसूल विभागाच्या ताब्यात वर्षानुवर्षे असलेली २८९८.
९४६२ हेक्टर खारफुटी जमिनी कांदळवन विभाग दक्षिण कोकण यांच्याकडे वर्ग झाली आहे. यामध्ये महसूल विभागाची ३११.७२७८ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. यामुळे खारफुटीचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कांदळ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर यांनी दिली.
रत्नागिरी-जिल्ह्यातील २,८९८ हेक्टर खारफुटी कांदळवनकडे वर्गखारफुटी किनारपट्टीचे वादळ, त्सुनामी आणि लाटांपासून संरक्षण करतात, धूप थांबवतात, पाण्याची गुणवत्ता सुधारतात, कार्बन शोषून हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करतात. मासे, खेकडे तसेच पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास पुरवतात ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो तसेच औषधी आणि इंधन म्हणूनही त्यांचा उपयोग होतो.
किनारपट्टीचे संरक्षण आणि मानवीवस्तीचे रक्षण करतात. त्यांची गुंतागुंतीची मुळे माती घट्ट धरून ठेवतात ज्यामुळे किनारपट्टीची धूप थांबते. अनेक मासे, खेकडे, शिंपले आणि इतर जलचरांसाठी नर्सरी (प्रजनन आणि वाढीचे ठिकाण) म्हणून काम करतात. पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी आश्रय देतात.
लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे गुन्हेगारीला चापयामुळे पाण्यातील प्रदूषण आणि अतिरिक्त पोषक तत्वे शोषून घेतात ज्यामुळे समुद्राची आणि खाडीची पाण्याची गुणवत्ता सुधारते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेतात आणि मातीत साठवून ठेवतात ज्यामुळे हवामानबदलाचा प्रभाव कमी होतो.
मासेमारी आणि सागरी उत्पादनांचा पुरवठा करतात ज्यामुळे मच्छीमार आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. पर्यावरण पर्यटन आणि संशोधनासाठी उपयुक्त आहेत. जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाली आहे.
त्यामुळे १६ ऑक्टोबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात खारफुटी जमिनी कांदळवन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. आतापर्यंत २८९८.९४६२ हेक्टर जमीन वनविभाग आणि महसूल विभागाकडून कांदळवन विभागाकडे वर्ग झाली आहे.
यामध्ये खेड तालुक्यातील १८० हेक्टर, मंडणगड ३३० हेक्टर, दापोली ३२२ हेक्टर, चिपळूण ११९ हेक्टर, गुहागर २९२ हेक्टर, रत्नागिरी १२१० हेक्टर, राजापूर ४३५ हेक्टर, संगमेश्वर ६ हेक्टर जमीन वर्ग झाली. तर लांजा तालुक्यातील एकही हेक्टर जमीन वर्ग झालेली नाही. खारफुटीचा औषधी वापर खारफुटीचा औषधी उपयोग होतो. त्यांची साल, पाने, मुळे आणि फळे जखमा, अतिसार, पोटदुखी, त्वचेचे संक्रमणसारख्या अनेक आजारांवर पारंपरिक औषध म्हणून वापरली जातात.
महसूल विभागाकडून वर्ग झालेली तालुकानिहाय जमीन
तालुका जमीन क्षेत्र
खेड ३ हेक्टर
मंडणगड ०.३३४० हेक्टर
दापोली ३० हेक्टर
चिपळूण २ हेक्टर
गुहागर ०० हेक्टर
रत्नागिरी १८६ हेक्टर
राजापूर ८८ हेक्टर
संगमेश्वर ०.५३०० हेक्टर
लांजा ०० हेक्टर