टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2026 मधील पहिली आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मालिका विजयाची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या अंतिम सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कुठे आणि कधी पाहायला मिळेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.