Rajkummar Rao-Patralekha: राजकुमार राव आणि पत्रलेखा हे दोन महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर हे कपल पहिल्यांदाच पालक बनले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात एका छोट्या परिचे स्वागत केले आहे.
खास गोष्ट म्हणजे, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या मुलीचा जन्म त्यांच्या चौथ्या लग्नाच्या एनिवर्सरील झाला. त्यांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या गोड मुलीचे स्वागत केले. या कपलने एका पोस्टद्वारे चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली.
Crime News: ५०० रुपयांसाठी मैत्री विसरला; मित्राला क्रूरपणे संपवलं, तरुणानं मृतदेह घरी पोहोचवला, नंतर...राजकुमार रावने मुलीची पहिली झलक शेअर केली
मुलीच्या जन्माच्या दोन महिन्यांनंतर, राजकुमार आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. शिवाय, त्यांनी त्यांच्या छोट्या परीचे गोंडस नाव देखील उघड केले आहे. या कपलने १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. यामध्ये ते त्यांच्या मुलीचा हात धरलेले दिसत आहेत. फोटोमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. फोटोमध्ये राजकुमार, पत्रलेखा आणि त्यांच्या लाडक्या मुलीचे छोटे हात दिसत आहेत.
Govinda Affair: 'मी त्याला माफ करणार नाही...' गोविंदाच्या अफेअरवर पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली ६३ वर्षे...View this post on InstagramA post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)
राजकुमार रावच्या मुलीचे नाव
हा फोटो शेअर करताना, राजकुमारने त्याच्या मुलीचे नावही सांगितले. त्याने तिचे नाव 'पार्वती' ठेवले. कॅप्शनमध्ये, अभिनेत्याने लिहिले, "हात जोडून आणि संपूर्ण हृदयाने, आम्ही आमच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची ओळख करून देतो. पार्वती पॉल राव."