लोकप्रिय मराठी अभिनेत्री घरच्यांचा विरोध स्वीकारून अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली.
अभिनेत्रीचे अफेअर घरी समजताच तिला वडिलांनी पाईपनं मारले.
अभिनेत्री आता आपल्या प्रियकरासोबत सुखाने संसार करत आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभार अलिकडेच लग्न बंधनात अडकली. कोमलने 25 नोव्हेंबर 2025ला लग्नगाठ बांधली. कोमल कुंभारने गोकुळ दशवंतशी लग्न आहे. कोमल आणि गोकुळ अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. गोकुळ दशवंत एक उत्तम अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याचे मराठी इंडस्ट्रीत मोठी ओळख आहे. कोमल कुंभार मराठी मालिकांमध्ये दिसते. तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी घरच्यांचा विरोध होता. घरच्या लोकांचा विरोध स्वीकारून ती मुंबईत आली.
View this post on InstagramA post shared by tejas jagtap photography24 (@tejas_jagtap_photography_24)
कोमल कुंभारने नुकत्याच झालेल्या मिडिया मुलाखतीत घरच्यांचा विरोध स्वीकारून मुंबईला येणे. त्यानंतर गोकुळ सोबतचे नाते समजल्यावर घरच्यांनी दिलेली वागणूक हा प्रवास सांगितला आहे. या खडतर प्रवासात तिला तिच्या नवऱ्याने म्हणजेच गोकुळने खूप साथ दिली. 'सहकुटुंब सहपरिवार', 'अबोली' यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील तिचे अंजली (अंजी) हे पात्र खूपच गाजले.
कोमल कुंभार आणि तिचा नवरा गोकुळने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. मुलाखतीत कोमलने सांगितले की, आई-वडीला माझ्यामागे लग्नासाठी लागले होते. मुलगा बघू बोलत होते. मला वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. मात्र तेव्हा माझे मुंबईत ऑडिशन होते. मला तेथे जायचे होते. मात्र घरातले सोडत नव्हते. मला समजावण्यासाठी घरी मामा देखील आला. तेव्हा आईने मला विचारले की, "तुझं कुणासोबत बाहेर काही सुरू आहे का?" तेव्हा मी आईला 'हो' असे बोली. मला त्या दिवशी समजले की प्रेमात किती ताकद असते.
View this post on InstagramA post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)
कोमल कुंभार पुढे म्हणाली की, "गोकुळचे समजताच घरी शांतता पसरली. वडीलांना सर्व समजले. तेव्हा वडिलांनी मला पाईपने खूप मारलं. मला त्यांनी खूप समजावले पण मी ऐकले नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम राहीले. नंतर दुसऱ्या दिवशी मला घरातून मुंबईला जाण्याची परवानगी मिळाली. मी गेले...तेव्हा मी 'सहकुटुंब सहपरिवार'चा प्रोमो शूट केला. " पुढे तिचा नवरा गोकुळ म्हणाला की, त्या वेळी कोमलला कुटुंबाने वेड्यासारखं मारले. तिच्या अंगावर वळ उठले होते. त्याच दिवशी तिला पाळी देखील आली होती..."
Lagnanantar Hoilach Prem : काव्याचा लाडका बोका संकटात; रम्याची चाल पडणार तिच्यावरच भारी, देशमुखांच्या घरात नवं वादळ - VIDEO