आदिवासी मुलांसाठी वाचनालय
मनोर ः सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दारशेत गावातील चौकी पाडा येथे वीणा वसंत वैद्य वाचनालय सुरू करण्यात आले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अक्षया पाटीलच्या हस्ते या वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी शर्वरी आपटे, नितीन पाटील, बबन किरकिरे, मनोज कवळी, जगदीश किणी, योगराज वझे तसेच चौकी पाड्यावरील सर्व शाळकरी मुले आणि त्यांचे पालक उपस्थित होते.