'त्याने हात कापून रक्ताने पेन्टिंग काढलं' राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाली, 'फोटोला नाही म्हटले म्हणून...'
esakal January 22, 2026 03:45 AM

radha Patil reveals a terrifying incident where a fan cut his hand: बिग बॉस मराठी ६ दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. घरातील सदस्यांची भांडणं, टास्कमध्ये सुरु असलेले वाद आणि एकमेकांवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे बिग बॉस मराठी चांगलाच चर्चेत आला आहे. १५ दिवसांतच सोशल मीडियावर बिग बॉसचे मिम्स सुद्धा व्हायरल होताय. अशातच आता घरातील सदस्य त्यांच्या वयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करताय.

अनेकांनी करिअरचा सुरुवातीचा काळ, खडतर प्रवास, लव्ह लाईफ, ब्रॉयफ्रेंड याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. डान्सर राधा पाटील हिने सुद्धा तिच्या वयक्तिक आयुष्यातील अनेक गुपितांचा खुलासा केलाय. तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं आहे. तसंच तिने ती लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं सुद्धा म्हणालीय.

बिग बॉस मराठी ६ च्या घरात प्रेक्षकांच्या लाडकी राधा पाटील हिची क्रेझ प्रचंड पहायला मिळतेय. राधाचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच राधने काही महिन्यापूर्वी 'गप्पा कट्टा' या पॉडकास्टमध्ये तिच्या चाहत्यासोबत घडलेला भयानक किस्सा शेअर केला होता. यात तिने सांगितलेलं की, 'फोटो दिला नाही म्हणून एका चाहत्याने तिच्यासमोर हात कापून घेतला होता.'

किस्सा सांगताना राधा पाटील म्हणाली की, 'पुण्यात एकदा माझा शो होता. त्यावेळी एका चाहत्याला मी फोटो काढू दिला नाही. म्हणून त्याने हात कापून घेतला. तिथं गर्दी खुप होती. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहचणं मला शक्य नव्हतं. त्यालाही माझ्यापर्यंत येता येत नव्हतं. त्यावेळी त्याने व्हॅनिटीमधून हात काढला आणि हातावर पुर्णपणे कट मारला. ते पाहून मला भिती वाटायला लागली. ते पाहून मी बाऊन्सरला सांगितलं की, त्याने हात कापून घेतलाय. तेव्हा त्याला बाजूला घेऊन आम्ही पट्टी वगैरे केली.'

View this post on Instagram

A post shared by Edit_By_SB (@edit_by_sb_01)