महापौरपदाच्या निवडीवरून राज्यात राजकारण तापले
संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
दिल्ली आणि भाजप नेतृत्वावरून खोचक टीका
ठाकरे गटातून फुटलेल्या नगरसेवकांवर कारवाई होणार
महापौरपदाच्या निवडीवरून राज्यातील २९ महानगर पालिकांमधील राजकारण तापले आहे. बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नगरसेवकांना फोडले जात आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये महापौर पदावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाद सुरू आहे. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 'मिंध्यांना दिल्लीला जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं याहून अपमानास्पद दुसरी गोष्ट नाही.', अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
संजय राऊतयांनी महापौरपदाच्या निवडीबाबत बोलताना एकनाथ शिंदेवर खरपूस टीका करत सांगितले की, 'शिंदेंना कोणी महापौर पदासाठी धूळ घालत नाही. आतली माहिती अशी आहे की शिंदे गटाला महापौरपदासाठी कुणीही गांभीर्याने विचारात घेत नाही. मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावे लागतेय. याहून अपमानास्पद गोष्ट दुसरी काहीच नाही.'
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कोण? भाजप की शिंदेसेनेचा...; देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवलासंजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्यादावोस दौऱ्यावर देखील सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'गट म्हणून नोंदणी करण्याचे काम चालू आहे. देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू आहे. ती संपल्यानंतर ते महापौराकडे लक्ष घालतील. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे भेटतात एकमेकांना, तिथे चर्चा करतात, हे हास्यास्पद आहे की भारतातल्या उद्योगासाठी दावोसला जाऊन तिकडे करार करतात. १४ लाख रोजगार मिळणार आहे. मुंबईत ९ लाख रोजगार मिळणार हे सुखावणारे आकडे आहेत. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस गेले किंवा अन्य कोणी, करार कोणाबरोबर झाले? JSW ज्याचे मुख्य कार्यालय बीकेसीला आहे. लोढा, संगमनेची कार्यालय आहे. हे हास्यपद आहे जगात हसू होतंय. जे आकडे दिले जात आहे ते जर खरे असतील तर मी स्वागत करतो. गौतम अदानी हे धारावी घेताय. ते ५ हजार रोजगार देऊ शकत नाही. जनतेला फसवू नका.'
Mumbai : भाजप मुंबईत महापौरपदावर ठाम, शिंदेसेनेला घाम? आता उपमुख्यमंत्री शिंदेंची नवी रणनीती काय? VIDEOकल्याण -डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गट आणि मनसेसोबत गेले त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर आपात्रतेची कारवाई सुरू आहे. ती यशस्वी होईल. मग ते कुठेही जाऊद्या. कोणाचेही असूद्या, ते मशालीवर निवडून आलेत. शिंदे हा अमित शहा यांचा पक्ष आहे. त्यांना सारखं हात जोडावे लागत आहेत. त्यांनी भाजपचे शेण खाल्ले तुम्ही बाळासाहेबांचे नाव घेऊ नका.'
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?