कोसबाड येथे दीक्षांत समारंभ
बोर्डी (बातमीदार)ः कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघ संचलित डॉ. शशिकला पुतणीस कला व वाणिज्य महाविद्यालय ब्युटी थेरीपी, असिस्टंट इलेक्ट्रिशन या कौशल्य आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ मंगळवारी उत्साहात पार पडला. तीन महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ७० विद्यार्थी यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामीण, आदिवासी भागातील युवक-युवतींसाठी रोजगार सक्षम कौशल्य देणारा हा उपक्रम आहे.