येत आहे तब्बल 10000mAh बॅटरीवाला फोन, पुढच्या आठवड्यात दोन नवे फोन बाजारात
Tv9 Marathi January 23, 2026 11:45 PM

तुम्हाला जर नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर थोडी वाट पाहा. कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. Realme कंपनीचा पहीला 10001mAh बॅटरीवाला स्मार्टफोन लाँच होणार आहे. याच बरोबर Vivo कंपनी देखील ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे.चला तर पाहूयात पुढच्या आठवड्यात येणाऱ्या या नवा फोनमध्ये काय फिचर्स असणार आहेत. त्यांची किंमत काय असणार आहे हे पाहूयात…

Vivo X200T Launch Date in India

या व्हिओ स्मार्टफोनला पुढच्या आठवड्यात २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ग्राहकांसाठी लाँच केले जाणार आहे.या अपकमिंग फोनसाठी Flipkart वर स्वतंत्रपणे मायक्रोसाईट तयार करण्यात आली आहे. ज्या साईटला भेट दिली तर फोनच्या संदर्भात काही माहिती आपल्याला मिळू शकते.हा फोन ऑरिजन ओएसवर काम करतो.

Realme P4 Power 5G Launch Date in India

रियलमी ब्रँडचा हा 5G फोन पुढच्या आठवड्यात २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ग्राहकांसाठी लाँच केले जाणार आहे. 10001 एमएएच बॅटरी असलेला हा फोन ट्रान्स सिल्वर, ट्रान्स ऑरेंज आणि ट्रान्स ब्ल्यू रंगात बाजारात उतरवला जाणार आहे.या अपकमिंग फोनसाठी Flipkart वर वेगळे पेज तयार केले आहे. ज्यास पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की हा फोन एकदा सिंगल चार्ज केला तर १.५ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळाणार आहे. २१८ ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये बायपास चार्जिंग आणि २७ वॉट रिव्हर्स चार्जिंग सारखी सुविधा असणार आहे.

वैशिष्ट्ये पूर्ण बॅटरी

Flipkart वर या फोनचे फिचर्सचा उल्लेख केला आहे. याची बॅटरी चार वर्षांपर्यंत ८० टक्क्यांपर्यंत टीकू शकते. स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी या फोनमध्ये मिडीयाटेक डायमेंसिटी ७४०० प्रोसेसर आणि स्मूद मोशन, स्टनिंग क्लॅरिटी आणि विव्हीड व्युजअलसाठी हायपर व्हीजन प्लस चिप मिळणार आहे. एआय फिचर्सने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट, ६५०० निट्स पीक ब्राईटनेस, एडीआर १० प्लस सपोर्ट मिळत आहे.

कॅमेरा सेटअपचा विचार करता या फोनमध्ये पाठच्या बाजूला ५० मेगापिक्सेल सोनी IMX882 कॅमरा सेंसर,सोबत वाईड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन रिएलमी युआय ७.० वर काम करतो. या फोनला तीन वर्षांपर्यंत एड्रॉईड ओएस अपडेट आणि चार वर्षांची सिक्युरिटी अपडेट्स देखील मिळणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.