रत्नागिरी- लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट ठेवण्यात ''सकाळ''चे
esakal January 24, 2026 03:45 AM

(टीप- फोटो आठ कॉलम लावायचा असल्याचे पंडितराव सरांनी सांगितले आहे.)

rat23p16.jpg-
19647
रत्नागिरी : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ब्रॅंडस ऑफ कोकण-गौरवगाथा प्रकाशनप्रसंगी सत्कारमूर्तींसह मध्यभागी बसलेले डावीकडून ‘सकाळ’चे कोल्हापूर युनिटचे संपादक निखिल पंडितराव, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि सरव्यवस्थापक यतीश शहा.
-----------
लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट ठेवण्यात ‘सकाळ’चे मोठे योगदान
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे; ‘सकाळ गौरवगाथा’चे उत्साहात प्रकाशन, कोकण रत्नांचा गौरव

एक नजर
* पोलिस अधीक्षकांकडून निर्भय पत्रकारितेचे कौतुक
* कोकणच्या शाश्वत विकासाचा व्यक्त केला ध्यास

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : धावपळीच्या आणि बदलत्या युगातही ‘सकाळ’ने आपली निर्भय आणि पारदर्शक पत्रकारितेची परंपरा जपली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीडियामध्ये ‘सकाळ’सारखी दैनिके जनजागृतीचे मोठे काम करत आहेत, हा स्तंभ बळकट करण्यात मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी काढले.
‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे हॉटेल सावंत पॅलेस येथे गुरुवारी आयोजित ‘सकाळ गौरवगाथा’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री धनश्री काडगावकर, संपादक निखिल पंडितराव आणि सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा उपस्थित होते.
या प्रसंगी बगाटे म्हणाले, ‘जेव्हा एखादा अधिकारी नवीन जिल्ह्यात कामाला येतो तेव्हा तिथली परिस्थिती समजून घेताना अनेक गोष्टी पडद्याआड असतात. अशा वेळी पत्रकार बांधव आम्हाला खरी परिस्थिती सांगून योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. पत्रकारितेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सूचनांमुळेच पोलिसदलाला काम करणे सोपे होते. रत्नागिरी पोलिसदलाच्या जिल्ह्यात सध्या अनेक नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. समाजातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पोलिसदल सदैव तत्पर आहे. विशेषतः तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिसांनी अनेक ‘ॲप्स’ विकसित केले आहेत, ज्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत आहे. कोकण प्रगतीच्या शिखरावर पोहोचावे, ही आमचीही इच्छा आहे; मात्र, हा विकास होताना कोकणचा निसर्ग आणि इथल्या माणसाच्या संस्कृतीला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तो विकास शाश्वत आणि निसर्गपूरक असावा.’
‘सकाळ’ने आपली जुनी, मूल्यधिष्ठित पत्रकारिता आजही टिकवून ठेवली आहे. त्याबद्दल मी ‘सकाळ’चा खरोखर आभारी आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. उद्योग, राजकारण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील ज्या व्यक्तींचा ‘गौरवगाथा’मध्ये समावेश झाला आहे त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. या उद्योजकांना आणि त्या त्या क्षेत्रामध्ये यश मिळवणाऱ्यांचा ‘सकाळ’ने सन्मान करून त्यांना प्रोत्साहान दिल्याबद्दल मी ‘सकाळ’चे आभार व्यक्त करतो, असे बगाटे म्हणाले.
दरम्यान, ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव यांनी प्रास्ताविकामध्ये सकाळ हे बातमीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र असल्याचे सांगितले. दै. ॲग्रोवन, सकाळ रिलीफ फंड, सकाळ इंडिया फाउंडेशन, तनिष्का व्यासपीठ, यिन अशा उपक्रमात सकाळ अग्रेसर आहे. डिजिटल माध्यमातही सकाळ नंबर १ आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यावसायिक, उद्योजकांची गौरवगाथा कॉफीटेबल बुकमध्ये मांडल्याचे त्यांनी सांगितले. सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा यांनी आभार मानले.

चौकट १
कोकण उद्योगाचेही माहेरघर ः अभिनेत्री धनश्री काडगावकर

अभिनेत्री धनश्री काडगावकर म्हणाल्या, ‘कोकण म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर केवळ निसर्गसौंदर्य येते; मात्र, आजच्या या ''सकाळ गौरवगाथा'' सोहळ्याने हे सिद्ध केले आहे की, कोकण उद्योगाचेही मोठे माहेरघर आहे. कोकणातील माणसे प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करू शकतात, हे आज सन्मानित झालेल्या व्यक्तींच्या कर्तृत्वावरून दिसून येते.’ धनश्री म्हणाल्या, ‘माझे चित्रीकरण आधी कोल्हापूरपर्यंतच मर्यादित होते; मात्र, ''शालू झोका...'' या गाण्याच्या निमित्ताने मी रत्नागिरीत आले आणि इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले. या गाण्यामुळे माझे कोकणाशी एक वेगळे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. आज पुन्हा या मातीत येऊन अशा कर्तृत्ववान लोकांच्या सन्मानाचा भाग होता आले, याचा मला मनापासून आनंद आहे. लहानपणापासून मी ''सकाळ'' वाचत आहे. ''सकाळ'' हे केवळ वृत्तपत्र नसून, ती एक सवय आणि आमची संस्कृती आहे. आज ''सकाळ''ने विविध क्षेत्रांत आपली पाळेमुळे घट्ट रोवली असून, समाजातील हिरे शोधून त्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा कौतुकास्पद आहे. इथल्या महिलांनी लोणचे, काजू यांसारख्या उद्योगातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही अनेकजण मोलाचे कार्य करत आहेत. या सर्व लोकांचा सन्मान होणे, ही अभिमानाची गोष्ट आहे.’
----------
चौकट २
गौरवगाथेतील सत्कारमूर्ती

देवेंद्र सिंह (माजी जिल्हाधिकारी, रत्नागिरी), विल्बर्ट प्रॉपर्टीज, उत्कर्ष सावंत, तुषार साळवी, डॉ. श्रुती मांगलेकर, शरद शिंदे, सत्यवान गवस, सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी, संजय वेतुरेकर, संजय सुतार, सुप्रभा नर्सरी, संजय मोदी, संदीप परटवलकर, सडेकर एन्वायरे इंजिनिअर्स प्रा. लि., सचिन हातणकर, स्वप्नील देसाई, सुवर्णसूर्य फाउंडेशन, सूर्यकांत गवस, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था, डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. संजय सावंत, डॉ. संघमित्रा फुले, रिगल एज्युकेशन सोसायटी, रश्मिन दुर्वे, डॉ. जयप्रकाश रामानंद, पराग गावकर, ओंकार रहाटे, मिलिंद सावंत, मिलिंद करंबेळकर, माणगाव दत्तमंदिर, मंदार आडिवरेकर, महेंद्र जैन, डॉ. मीरा बाणावलीकर, मंजुश्री कॅटरिंग, दी लिलाज बांबू हाऊस, कृष्णाई फूड्स, कौसर खान, कल्याणी मलुष्टे, जीवन देसाई, जे. डी. पाटील, हृदयनाथ गावडे, हेमंत सावंत, गणपत देसाई, गजानन रेवडेकर, दिगंबर नाईक, दयानंद कुबल, दापोली अर्बन बॅंक, चंद्रराज लोणचे, भाल गुरूकुल स्कूल, आर्यावर्त बीच रिसॉर्ट, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, अर्जुन रावराणे विद्यालय, अशफाक मापारी, आनंद तांबे, आनंद बांदिवडेकर, अनगर शिक्षण संस्था, आदित्य चौगुले यांचा गौरवगाथेतील सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.