BAR26B12916 बार्शी : प्रसन्नदाता गणेश मंदिरात महिलांची झालेली गर्दी.
बार्शीत वीस हजार भक्तांनी घेतला महाप्रसाद
प्रसन्नदाता गणेश मंदिरात भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २३ : गणेश जयंतीनिमित्त पहाटे पासून सायंकाळी उशिरापर्यंत हजारो भाविकांनी श्री प्रसन्नदाता गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी दीपक ढगे यांच्याहस्ते गणपतीला १०८ लिटर दुधाचा अभिषेक करण्यात आला. सुमारे २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
देवणे गल्ली येथील श्री. प्रसन्नदाता गणेश मंदिरात गुरुवारी दुपारी १२ वाजता पाळणा मोठ्या उत्साहात झाला. तर रात्री धनंजय गायकवाड यांच्या हस्ते आरती केली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष कमलेश मेहता, सचिव अरुण माने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी १२ वाजल्यानंतर गणेश उत्सव झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसाद दिला. या कार्यक्रमास अमोल येवणकर, बसवेश्वर गाढवे, हर्षल रसाळ, राजकुमार मेहता, राहुल कुंकूलोळ, हेमंत गाढवे, राजू नान्नजकर, अशोक परमार, तम्मा विभूते, नंदकुमार मारडकर यांच्यासह प्रसन्नदाता गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.