मुंबई: ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना जागृत करत हिंदुंची राजकीय शक्ती बनू शकते हे दाखवून दिले. मात्र सध्याच्या राजकारणात हिंदुत्वाचा जो बाजार मांडला गेला आहे, ते पाहून बाळासाहेब आज असते तर व्यथित झाले असते,‘’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक उड्डाण पूल होणार खुला; सेनापती बापट रस्त्यावीरल वाहतूक कोंडी सुटणार!सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून ‘शिसारी’ येत असल्याचा तिटकारा व्यक्त करत महाराष्ट्राचा ‘गुलामांचा बाजार’ झाला असल्याचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे आक्रमक झाले.
ते म्हणाले जुन्या काळात जसा चावडीवर गुलामांचा लिलाव व्हायचा, तसाच लिलाव आज महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रतिनिधींचा सुरू आहे. कल्याण-डोंबिवली असो वा महाराष्ट्र, जे काही सध्या सुरू आहे ते पाहून शिसारी येते. हिंदूंना राजकीय शक्ती म्हणून मतदान करायला बाळासाहेबांनी शिकवले. मात्र, आज त्याच हिंदुत्वाचा बाजार मांडला गेला. बाळासाहेब काय होते, हे जगाला पूर्णपणे कळलेले नाही. आम्ही घरातले असूनही आम्हाला ते पूर्ण उमजले नाहीत, तर बाहेरच्यांना काय कळणार ? , असे राज ठाकरे म्हणाले.
Solapur Airport: सोलापूरहून इंदौरला बुधवारपासून विमानसेवा; वनस्टॉप विमानसेवा, मुंबईला जाणारे विमान हेच पुढे इंदौरला जाणार! डॉक्टराने पक्ष बदलला की काय?‘‘माझे फॅमिली डॉक्टर आहेत, यादव म्हणून. मराठी यादव. मी त्यांच्याकडून औषधे घेतले होते आणि उद्धव ठाकरे यांनाही दिले होते. ते दोन दिवसांत बरे झाले. पण मी त्याच डॉक्टरांकडून औषधे घेत आहे, आज सहा दिवस झाले. पण तरी मला बरं वाटत नाही. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हटलं की माझ्या डॉक्टरांनी देखील पक्ष बदलला की काय?’’ असं राज ठाकरे यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.