शुक्ला कंपाउंड तोडक कारवाई प्रकरणात मोठी अपडेट
राहुल नार्वेकर यांच्या दालनात काल बैठक
शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर गोपाळ शेट्टी यांचा सवाल
संजय गडदे, साम टीव्ही
दहिसर येथील शुक्ला कंपाउंड तोडक कारवाई प्रकरणासह मुंबईतील संपूर्ण झोपडपट्टी विषयावर विधानभवनात सलग बैठका पार पडल्या. विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्व मुद्दे सविस्तर मांडण्यात आले. अवघ्या तीन तासांत चर्चेचे मिनिट्स तयार करून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शिवाय राहुल नार्वेकर यांच्या दालनात देखील काल बैठक झाली यावर राहुल नार्वेकर यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त यांना शुक्ला कंपाउंड स्लम अॅक्ट नुसार संरक्षण असताना कारवाई झालीच कशी असा संतप्त सवाल विचारत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले अशी माहिती गोपाळ शेट्टी यांनी दिली.
धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकारनार्वेकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत केवळ शुक्ला कंपाउंड नव्हे तर मुंबईतील झोपडपट्टी धोरणावर नार्वेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. स्लम अॅक्टअंतर्गत संरक्षण असताना महापालिकेने तोडक कारवाई कशी केली, असा जाब त्यांनी सहाय्यक आयुक्तांना विचारला. मात्र याबाबत डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर संध्या नांदेडकर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पुढील बैठकीसाठी थेट पालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले.
या प्रकरणात ‘१९६२ चा पुरावा नाही’ या कारणावरून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र स्लमचे वैध कागदपत्र सादर करूनही त्याचा कुठेही उल्लेख न केल्याचा गंभीर आरोप गोपाळ शेट्टी यांच्याकडून करण्यात आला. काही जमीनधारकांनी जागा विकत घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. न्यायालयाचा अवमान (काँटेम्प्ट ऑफ कोर्ट) काढण्याचा अधिकार न्यायालयाचा असताना महापालिकेने स्वतःच ती भूमिका का घेतली, असा सवाल उपस्थित झाला.
आज बाळासाहेब नाहीयेत ते बरं आहे; राज ठाकरे असे का म्हणाले? VIDEOमाजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बैठकीत ठाम भूमिका मांडत सांगितले की, ज्यांची घरे तोडली आहेत त्यांना पुन्हा घरे बांधून दिलीच पाहिजेत. जोपर्यंत पर्यायी घरे मिळत नाहीत तोपर्यंत बाधितांना भाडे देण्यात यावे. सरकारची भूमिका लोकांना घरे देण्याची असताना महापालिकेने लोकांची घरे तोडून लोकशाहीची पायमल्ली केली आहे, असा आरोप त्यांनी केला. “माझा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे—ज्यांची घरे तोडली आहेत त्यांना घरे मिळालीच पाहिजेत. माझा शब्द आहे, मी या लोकांना घरे मिळवून देणार,” असा ठाम निर्धार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.
Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुलदहिसर पूर्वेकडील रावळपारा परिसरातील शुक्ला कंपाऊंडमध्ये असलेल्या झोपड्या आणि व्यावसायिक गाळे महापालिकेकडून निष्कासित करण्यात आले मात्र या विरोधात गोपाळ शेट्टी यांनी आंदोलन पुकारल्यानंतर हा विषय हिवाळी अधिवेशनात देखील मांडण्यात आला. आमदार प्रकाश सुर्वे आमदार मनीषा चौधरी आमदार संजय उपाध्याय आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार सुनील प्रभू या आमदारांनी हा विषय अधिवेशनात उचलून धरल्यामुळे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले होते. अखेरीस आता थोडं कारवाई थांबल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याचं श्रेय रहिवाशांनी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आज रहिवाशांनी पेढे भरून गोपाळ शेट्टी यांच्या लढ्याचे कौतुक केले.