IND vs NZ 2nd T20I: भारतीय गोलंदाजांनी फास आवळला! न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी 'चतुराई'ने सापळा रचला; सामना क्षणात फिरला
esakal January 24, 2026 10:45 AM

India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket Update: न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी ज्याप्रकारे सुरुवात केली, ते पाहता भारतासमोर धावांचा डोंगर उभा राहिल असे वाटले होते. पण, हर्षित राणाने पहिला धक्का दिला आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांमध्ये जोश भरला.. त्यांनी उत्तम मारा करताना न्यूझीलंडला अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर रोखले. कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. हर्षित राणा व वरुण चक्रवर्थी यांनीही महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले.

सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या जागी हर्षित राणा व कुलदीप यादव यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे. फलंदाजीला आलेल्या डेव्हॉन कॉनवे आणि टीम सेईफर्ट यांनी आक्रमक सुरुवात केली. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात १८ धावा डेव्हॉन कॉनवेने चोपल्या. त्यानंतर टीम सेइफर्टने तिसऱ्या षटकात अर्शदीपला सलग चार चौकार हाणले. पण, चौथ्या षटकात हर्षित राणाने सामना फिरवला.

IND vs NZ 2nd T20I : सुसाट सुटलेल्या न्यूझीलंडला हर्षित राणाने रोखले, विकेटनंतर केला 'तो' इशारा; नेमका अर्थ काय? VIDEO

हर्षितने चेंडूची गती थोडी कमी केली आणि कॉनवेला मोठा फटका मारण्यास भाग पाडले. हार्दिक पांड्याने मिड ऑफवर सोपा झेल टिपला. कॉनवे ९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून १९ धावांवर माघारी परतला. हर्षितने ते षटक निर्धाव टाकले. पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्थीने किवींना मोठा धक्का दिला. गुगलीवर मोठा प्रयत्न मारण्याच्या प्रयत्नात सेइफर्ट २४ धावांवर झेलबाद झाला. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात हर्षितच्या गोलंदाजीवर रचिन रवींद्रने १९ धावा चोपून संघाला २ बाद ६४ धावांपर्यंत पोहोचवले.

रचिनने ८व्या षटकात वरुणच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत षटकार खेचले. किवींच्या धावांचा वेग कमी होत नव्हता आणि त्यांनी १० षटकांत २ बाद ११३ धावांपर्यंत मजल मारली. कुलदीप यादवने संघाला तिसरे यश मिळवून देताना ग्लेन फिलिप्सला ( १९) माघारी पाठवले. १२ व्या षटकात भारताने गोलंदाजीचा सातवा पर्याय आणला आणि शिवम दुबेने पहिल्याच षटकात डॅरिल मिचेलला ( १८) बाद करून मोठे यश मिळवून दिले.पुढच्याच षटकात कुलदीप यादवने चतुराईने चेंडू टाकून रचिनला बाद केले. त्याने २६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली.

न्यूझीलंडने १५ षटकांत ५ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली होती आणि शेवटच्या पाच षटकांत खरा खेळ रंगणारा होता. मार्क चॅपमन १० धावांवर हार्दिकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्याने किवीचा संघ अडचणीत आला. पण, कर्णधार मिचेल सँटनर मैदानावर उभा राहिला आणि त्याने संघाला दोनशेपार पोहोचवले. जॅक फोल्केसला ( १५) सोबत घेऊन त्याने १९ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. सॅटनरने २७ चेंडूंत नाबाद ४७ धावांची खेळी केली. किवींनी ६ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारली.

Big Breaking : जय शाह बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम करणार ! प्रचंड संतापलेत... T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री; घोषणा लवकरच...
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.