दौंड , ता. २३ : जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेत गोपाळवाडी (ता. दौंड) येथील तेजस गणेश शिंदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा स्पर्धेंतर्गत फुलगाव (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत तेजस याने ५वी ते ८वी या गटात प्रथम क्रमांक पटकावला. तेजस हा गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे.
04403