Palash Mucchal : पलाशच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं संकट, वकिलाच्या दाव्याने खळबळ, त्या गोष्टीवर…
admin January 24, 2026 01:24 PM
[ad_1]

गायक आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल (Palash Mucchal) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेता-निर्माता विद्यान माने याने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पलाशने भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) फसवणूक केली असा त्याचा दावा आहे. तसेच त्याने पलाशवर एका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटातील गुंतवणुकीशी संबंधित 40 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोपही केला. विद्यानने महाराष्ट्रातील सांगली येथे तक्रार दाखल केली असून यामुळे पलाश मुच्छल पुन्हा चर्चेत आला आहे.

पलाशच्या वकिलांची एंट्री

मात्र याप्रकरणात आता पलाश मुच्छल याच्या वकिलांची एंट्री झाली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं दिली. “तो (विद्यान) म्हणतो की त्याने आम्हाला पैसे दिले, पण त्याने चेक किंवा बँक ट्रान्सफरने पैसे दिल्याचा कोणताही पुरावा नाही. पलाश दुसऱ्या महिलेसोबत पकडल्याच्या सर्व आरोपांबद्दल काय पुरावा आहे? आम्ही या व्यक्तीला ओळखत नाही. आम्ही त्याला स्मृतीच्या वडिलांद्वारे (श्रीनिवास) भेटलो. आमचा त्याच्याशी थेट संबंध नाही. तो इतका वेळ गप्प का राहिला? तो (विद्यान) लग्न मोडल्यानंतरच पुढे आला. (याप्रकरणी) पलाश कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहे” असं त्याच्या वकिलांनी सांगितलं आहे.

विद्यानचे पलाशवर मोठे आरोप

नोव्हेंबर 2025 मध्ये स्मृती पलआशचं लग्न होणार होतं, मात्र ते अचानक मोडलं. त्यानंतर स्मृतीचा मित्र आणि अभिनेता-निर्माता विद्यान माने याने पलाश मुच्छलवर अनेक आरोप केले आहेत. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचा दावाही त्याने केला. ” मी लग्नाच्या तयारीदरम्यान (23 नोव्हेंबर 2025) उपस्थित होतो. मात्र तेव्हाच तो ( पलाश मुच्छल) दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडला गेला. ते एक भयानक दृश्य होते; स्मृतीच्या सहकारी मैत्रिणींनी, भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चांगला चोप दिला’ असं विज्ञान याने म्हटलं होतं.

भारतीलय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश यांचं 23 नोव्हेंबरला सांगलीत लग्न होणार होतं. त्यांची हळद, मेहंदी, संगीत सेरेमनी यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र लग्नाच्या दिवशी असं काही घडलं की ते अनचाक पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचं कारण आधी दोन्ही कुटुंबियांतर्फे सांगण्यात आलं होतं. तथापि, नंतर पलाशने स्मृतीला फसवले अशा चर्चा सुरू झाल्या. अखेर डिसेंबर २०२५ मध्ये हे लग्न कायमचे रद्द करण्यात आले. खुद्द स्मृतीनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्न मोडल्याची घोषणा केली होती.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.