प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे अवघ्या 26 व्या वर्षी निधन, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
Saam TV January 25, 2026 01:45 AM

इंडोनेशियाची लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कलाकार स्टार लूला लहफाचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच, आता तिच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार, 23 जानेवारी रोजी इंडोनेशियातील दक्षिण जकार्ता येथील धर्मवांग्सा कॉम्प्लेक्समधील तिच्या फ्लॅटमध्ये लूलाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोसायटीतील सुरक्षारक्षकांना लूला लहफाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी लूलाच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. लूला लहफाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by lula lahfah ♡ (@lulalahfah)