मुंबई : बृहन्मुंबई महापालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत व मकर संक्रांतनिमित्त कापूरबावडी येथे शुक्रवारी (ता. २३) सेवानिवृत्तांकरिता आयोजित करण्यात आलेल्या हिंदी, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला हाउसफुल प्रतिसाद लाभला. रवींद्र मोरे, रंजना पेठे, शिरीष सराफ, मिलिंद भागवत, प्रसाद भसागरे, प्रकाश मोरये, प्रताप जाधव, सुजाता सावंत, सुधा साटम, अनघा परेरा, शारदा काकडे, संध्या पवार, विलास डोनसाळे, लीलाधर भट, संजय गायकवाड, विजय करंगुटकर, महेश फडके, मंजिरी जोशी, संजय जोशी या सेवानिवृत्त सभासदांनी बहारदार गाणी सादर केली. संघटनेच्या महिला विभागाच्या सुजाता जोशी यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. नेहमीप्रमाणेच कार्यवाह डॉ. मारुती नलावडे आणि अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर यांनी यथोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन वर्षा सबनीस आणि वंदना शिर्के यांनी केले.