-rat२४p१०.jpg-
P२६O१९७७८
रितेश बावनकर
रितेश बावनकर
यांना डॉक्टरेट
सावर्डे, ता. २४ : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ शाळेतील शिक्षक रितेश बावनकर यांनी नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. मूळ भंडारा जिल्ह्यातील असणारे बावनकर यांची मे २०२४ला कोळंबे शाळेत नियुक्ती झाली. सातारा येथे पार पडलेल्या शिक्षक व अधिकारी यांच्या विभागस्तरीय स्पर्धेत व्यक्ती अभ्यास स्पर्धेत त्यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी समाजकार्य या विषयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ अंतर्गत मजुरांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक स्थितीचे अध्ययन या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त झाली. त्यांना नागपूर येथील डॉ. नरेश कोलते यांचे मार्गदर्शन लाभले.