'रोमान्सबाबत मी त्याला 10 पैकी 15 गुण देईल' राणी मुखर्जी आदित्य चोप्रा बद्दल बोलताना म्हणाली...'तो मला...'
esakal January 26, 2026 11:45 PM

Rani Mukerji Talks About Husband Aditya Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. राणी सोशल मीडियावर सक्रिय नसल्याने चाहत्यांना तिच्याबद्दल जास्त माहिती नसते. ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीच गोष्ट कधीच सोशल मीडियावर शेअर करत नाही. अशातच तिने तिच्या पती आदित्य चोप्राबद्दल सांगितलं आहे.

नुकतीच राणीने कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ला हजेरी लावली होती. यावेळी राणीला कपिलने आदित्य चोप्रा किती रोमँटिक आहे? असा प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी आदित्य चोप्राबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिने पती आदित्या चोप्राचा स्वभाव तसंच काळजी घेण्याच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे.

कपिलने राणी मुखर्जीला विचारलं की, आदित्य यांनी कधी प्रपोज केलं आहे का? यावर त्या म्हणाल्या की, 'या गोष्टी माझ्यासाठी खुप खासगी आहे. त्या मी सगळ्यासमोर नाही शेअर करु शकत' तसंच पुढे कपिलने राणी यांना विचारलं, आदित्य किती रोमँटिक आहेत? त्यावर राणी म्हणाली की, 'आदित्य यांना दहापैकी गुण द्यायचे असतील तर मी १५ देईन. सगळ्या मुलीना लग्न करताना जोडीदार चांगला असणं महत्त्वाचं असतं. आदित्य खूप छान आहे.' असं तिने म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Rani Mukerji (@_ranimukerji)