फुलेनगरमधील शिबिरात
२५० रुग्णांची तपासणी
वाई, ता. २५ : धन्वंतरी मेडिकल ट्रस्ट मुंबई, महात्मा फुले स्मारक समिती आणि गणेशोत्सव मंडळाच्या वतीने फुलेनगर येथे (कै.) वसंतराव नाईकवडी आणि (कै.) रामचंद्र जमदाडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. या शिबिरात २५० जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांच्या हस्ते सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यावेळी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, डॉ. महेश मेणबुदले, डॉ. अमोल नाईकवडी, राजेंद्र तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. देव म्हणाले, ‘‘ग्रामीण आणि निमशहरी भागात मोफत शिबिराची गरज आहे. सामान्य रुग्णांची प्राथमिक तपासणी आणि अचूक निदान झाले, तर रुग्णाला पुढील आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होते.’’ या शिबिरात रुग्णांच्या हाडांची ठिसूळता, नसांची कार्यक्षमता, मधुमेह, बॉडी मास इंडेक्स, ईसीजी, दमा, रक्तदाब, डोळ्याचा पडदा, नंबर आणि चष्मा वाटप करण्यात आले. शिबिरासाठी धन्वंतरी मेडिकल ट्रस्टचे धन्वंतरी डॉ. स्नेहलता बागल, डॉ. सुरेखा चाचड, डॉ. नम्रता नाईकवडी, डॉ. अमोल नायकवडी, डॉ. अनुराधा भोसले, डॉ. विश्रांती फडतरे आदींनी सहभाग घेतला. अरुण आदलिंगे यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी जमदाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास रंगराव जमदाडे, नीलेश जमदाडे, सचिन जमदाडे, चिंतामणी जमदाडे, विशाल जमदाडे, सतीश ससाणे, विकास जमदाडे, श्रीकांत जमदाडे, रमेश जमदाडे, स्पंदन हॉस्पिटल, घोटवडेकर हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
26B07504
फुलेनगर : मोफत आरोग्य शिबिर उद्घाटनप्रसंगी अनिल देव, डॉ. शेखर कांबळे, अरुण आदलिंगे, डॉ. स्नेहलता बागल, डॉ. सुरेखा चाचड, रंगा जमदाडे.