Pune : पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडवी आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती मिळत आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. दीप्ती मगर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षाच्या मुलीसमोरच इंजिनियर विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी असे पतीचे नाव आहे तर सुनीता चौधरी सासूचे नाव आहे, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दिराचे नाव आहे.
दरम्यान, या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 2019 ला यांचा विवाह झाला होता लग्नामध्ये 50 तोळे सोने देण्यात आले होते. नंतर विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले, त्यात तिच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप केले आहेत तिचा छळ करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र तरीही त्रास संपला नाही अखेर दीप्तीने काल रात्री गळफास लावून केली आत्महत्या केली आहे. आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.