केसांसाठी महागडे हेअर सीरम, हेअर मास्क, शाम्पू वापरण्याऐवजी काही घरगुती उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. केसांसाठी अंडी फायदेशीर असतात. त्यामुळे मऊ आणि रेशमी केसांसाठी तुम्ही काही हेअर मास्क घरी बनवू शकता. ( eggs hair mask for hair growth )
अंडी केसांसाठी का फायदेशीर असतात?
अंडी केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. कारण त्यात प्रथिने, बायोटिन आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे घटक निरोगी केसांसाठी आवश्यक असतात. ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून देखील काम करतात.
अंडी आणि मधाचा हेअर मास्क
अनेकदा बाहेरील धूळ, प्रदूषणामुळे टाळूत कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे कोंडा आणि केसगळती वाढते. त्यासाठी तुम्ही मध आणि अंड्याचा हेअर मास्क लावू शकता. अंड्यामध्ये मध पूर्णपणे मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि २० ते ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पू आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे टाळूला पोषण मिळते आणि केसांची वाढ होते.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क
तुमचे केस चमकदार बनवण्यासाठी अंडी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क देखील लावू शकता. एका अंड्यामध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे केस मॉइश्चरायझ होतील, केसगळती कमी होईल.
हेही वाचा: How to Choose Parlor: ब्युटी ट्रीटमेंटसाठी चांगले पार्लर कसे शोधाल? ‘या’ गोष्टी तपासा
अंडी आणि कोरफडीचा हेअर मास्क
केसगळती रोखण्यासाठी तुम्ही कोरफड आणि अंडी वापरू शकता. ताजे कोरफड जेल घ्या आणि ते अंड्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या केसांवर ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतील आणि नैसर्गिक चमक येईल.