फिट अँड फाईन असलेल्या श्रेयस अय्यरला टीम इंडियातून डावलण्याचं कारण काय? जाणून घ्या
Tv9 Marathi January 30, 2026 05:45 AM

भारत आणि न्यूझीलंड यांच्याच पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपला आहे. भारताने ही मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना शिल्लक राहिला आहे. असं असताना आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात श्रेयस अय्यरला संधी दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जर श्रेयस अय्यरला टी20 प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचं नव्हतं, तर घेतलंच का? आकाश चोप्राने थेट सल्ला दिला की, जर तुम्हाला श्रेयस अय्यरला खेळवायचं नसेल तर तुम्ही कोणत्याही युवा खेळाडूला संधी द्या. कारण त्याला काही फायदा होईल. चला समजून घेऊयात की, श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये स्थान का दिलं नाही?

श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये न घेण्याचं कारण

श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून सावरला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला. पण तिलक वर्मा दुखापतग्रस्त असल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेला मुकला. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली. पण असं असूनही त्याला काही संघात जागा मिळाली नाही. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रेयस अय्यरची निवड झालेली नाही. त्यामुळे या संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संधी दिली गेली. तिलक वर्मा फिट अँड फाईन आहे. त्यामुळे सराव सामन्यात मैदानात उतरणार हे नक्की आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये स्थान देऊन पेच वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे इतर खेळाडूंना संधी दिली जात आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निवडलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. चौथ्या टी20 सामन्यात इशान किशनच्या जागी संजू सॅमसनला त्याच कारणामुळे संधी दिली गेली. संजू सॅमसन तीन सामन्यात फेल गेल्याने इशान किशनला खेळवण्याची मागणी होत होती. पण टीम व्यवस्थापनाने संजू सॅमसनवर विश्वास टाकला.

मालिकेतील पहिले तीन सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 216 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताचा डाव 165 धावांवर आटोपला. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव सर्व फेल गेले. हार्दिक पांड्याही 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात शिवम दुबेची बॅट तेवढी चालली. त्याने 23 चेंडूत 65 धावा केल्या. पण इतर मधल्या फळीतील फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी सुधारणा करणं गरजेचं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.