- rat२९p७.jpg-
२६O२०६४६
सावर्डे ः प्रा. तानाजी कांबळे यांचे स्वागत करताना मीरा जोशी.
ग्रंथ, लोकसाहित्याचे संगणकीकरण करा
तानाजी कांबळे ः सावर्डेतील हायस्कूलमध्ये कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २९ : आजच्या संगणकीय तंत्रज्ञान युगात प्राचीन ग्रंथ, लोककला, लोकसाहित्य यांचे संगणकीकरण करणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे मराठी भाषा व संस्कृती अधिक व्यापक पातळीवर पोहोचू शकते, असे प्रतिपादन कला, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी कांबळे यांनी व्यक्त केले.
सावर्डे येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे अभिजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, अभिजित मराठी भाषा आता जागतिक स्तरावर पोहोचली असून, मराठी साहित्य व संस्कृतीचा ठसा जगभर उमटत आहे. मराठी भाषेचे समृद्ध साहित्य, प्राचीन ग्रंथ, लोकगीते व लोकसंस्कृती ही आपली मोठी संपदा असून, ती पुढील पिढीसाठी जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवावा आणि संगणक माध्यमांतून मराठीचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी मराठी विभागातर्फे पुस्तके भेट देण्यात आली. मुख्याध्यापिका मीरा जोशी यांनी प्रास्ताविक तर अजित मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.