मुंबई, ता. ३० : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास कामासाठी फलाट क्रमांक १६ व १७वर १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत एकूण ८५ दिवसांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. रेल लँड अथॉरिटीकडून डेव्हलपमेंट सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास सुरू आहे.
पुनर्विकासाच्या या टप्प्यात फलाटांवरील पायाभूत सुविधा बळकट करणे, संरचनात्मक दुरुस्ती, ट्रॅक सुधारणा ओव्हरहेड इक्विपमेंटची कामे तसेच सुरक्षिततेशी संबंधित अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ बंद ठेवण्यात येणार आहेत. या फलाटावरून अमरावती, अकोला, नागपूर, बल्लारशाह, भुसावळ, जळगाव, नांदेड, लातूर आदी महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या सुटतात.
Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू१ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत अप मार्गावरील संबंधित गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकात थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानक गाठण्यासाठी लोकल रेल्वे किंवा अन्य पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ही गाडी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची सुधारित माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
फलाट क्रमांक १६,१७ बंद
१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस
११००२ बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस
१२८१९ हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस
११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस