आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. मात्र या स्पर्धेआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पाकिस्तान स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने खेळणार असल्याचं स्पष्ट आहे.