Maharastra Update : सोन्या अन् चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण...
Sarkarnama February 02, 2026 04:45 PM
Gold Rate : सोन्या अन् चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण...

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार 800 रुपये तर, चांदीच्या दरात तब्बल 53 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपये तर, चांदीचे दर 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर आले आहेत. दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा दीड लाखावर तर चार लाखांचा आकडा पार करणाऱ्या चांदीचे दर देखील अडीच लाखांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Hasan Mushrif Update : 'अजितदादांनी 'तुतारी' अन् 'घड्याळ' चिन्हं जवळपास एकत्र केलं होतं!'

अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा होती का? या वर उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "अजितदादांनी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये मी वक्तव्य ऐकलं. पंरतु आम्हा राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींना घेऊन अशा चर्चा कधी झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी दादांनी चिन्ह एक केलं, ज्याला तुतारीवर लढायचचं त्यांनी त्यावर लढा अन् ज्यांना घड्याळ चिन्हावर लढायचं त्यावर लढा असं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी दादांनी सांगितलं तसं लढलो, मात्र दादांनंतर आता अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत."

Supriya Sule And Sunetra Pawar : दादांबरोबरचा जुना फोटो शेअर करत @बारामती…; सुप्रिया सुळे यांचे एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स!

सुप्रिया सुळे यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी खास कॅप्शनही दिले. सुप्रिया सुळे यांनी @ बारामती…… असे कॅप्शन दिले आहे. या व्हॉट्सअप स्टेट्सच्या माध्यमातून काहीतरी मोठे संकेत देताना सुप्रिया सुळे या दिसत आहेत.

Hasan Mushrif : विलिनीकरणासाठी जयंत पाटील माझ्याशी बोलले होते; हसन मुश्रीफांचा मोठा दावा

अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी मोठा दावा केला आहे. 'दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटील माझ्यासाठी बोलले होते. पण आम्हाला घेऊन कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut : 'अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत'

'अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर, पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? असेही गंभीर प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहे.

Jaykumar Gore : 'AIMIM'ची लायकी जास्त..; जयकुमार गोरे यांची टोलेबाजी

'आमचा सुफडा साफ करणाऱ्यांच्या पेक्षा 'AIMIM'ची लायकी जास्त आहे. सोलापूर महापालिकेत काँग्रेसला दोन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खातेही उघडता आले नाही. तर 'AIMIM'यांच्या पेक्षा मोठा पक्ष ठरला. 'AIMIM'ची लायकी यांच्यापेक्षा जास्त आहे. भाजपला संपवणारे अजून जन्माला यायचे आहे,' अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.

BMC Election 2026 Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेचा मुंबई महापालिकेतील गटनेता ठरला

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील 29 नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे. तत्पूर्वी शिंदेसेनेकडून मुंबई महापालिकेतील गटनेते पदासाठी अमेय घोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

Sunetra Pawar : मयत सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट घेणार

अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सांत्वनपर भेट घेणार आहे.

सुनेत्रा पवार प्रितीसंगमावर दाखल झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. Mumbai live :मुंबईचा महापौर आज ठरणार

Mumbai live :मुंबईचा महापौर आज ठरणार

मुंबईचा महापौर कोण होणार यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापालिकेच्या सत्ता स्थापनेचे सूत्र आज ठरणार. आहेत. महायुती दोन गटात नगरसेवकांची नोंदणी करणार आहे. भाजपचा एक गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नोंदणी करणार आहेत.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच आज दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत. आज (2 फेब्रुवारी) सुनेत्रा पवार या कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार या कराड येथील प्रितीसंगम बाग येथे जातील. त्यानंतर सुनेत्रा पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील. फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.