Gold-Silver Rate Today 2 February 2026 : ताईच्या, दादाच्या लग्नाची हीच ती वेळ… सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीचे भाव घसरले, पटापट चेक करून ज्वेलर्सचं दुकान गाठा
Tv9 Marathi February 02, 2026 04:45 PM

Gold Rate Today : कमॉडिटी बाजारात सुरू असलेली घसरण कायम असून सोन्याच्या आणि चांदीच्या दरातही मोठा फरक पडला आहे. सोन्याच्या किंमती आणखी खाली घसरल्या आहेत. आज, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, २ फेब्रुवारी रोजी सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम साठी 1 लाख 60 हजार 720 रुपयांवर आला. तर मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 60 हजार 570 रुपयांवर पोहोचला आहे. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 320 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 ​​रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट प्राईस प्रति औंस 5,087.73 डॉलर वर व्यवहार करत आहे. कमकुवत जागतिक कल, डॉलरमधील वाढ आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्यामुळे सोन्याचे भाव घसरले. चांदींच्या दरातही घसरण झाल्याचं दिसून आलं.

फ्युचर्स मार्केटमध्ये झालेल्या या गदारोळामुळे सोनं-चांदीच्या किंमती रेकॉर्ड स्तरापासून खूप खाली आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण बाजाराचे समीकरणच बदलल्याचं दिसत आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर

दिल्लीत सोन्याची किंमत : राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1, 60, 720 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1, 47, 340 रुपये आहे.

तर मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात दर: सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,47,190 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1,60,570 रुपये इतका आहे.

पुणे आणि बंगळुरूमधील किंमत : या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,60, 570 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,47,190 रुपये आहे.

चांदीचे दर किती झाले ?

सोन्याप्रमाणेच चांदीच्या घसरणीचा कलही कायम आहे. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 3,49, 900 रुपयांपर्यंत घसरली. एका आठवड्यात किंमत 15 हजार रुपयांनी वाढली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.